आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Robert Kiyosaki Advice; Silicon Valley Bank Collapse | Financial Crisis | Rich Dad Poor Dad

2 बँका बुडाल्या...आणखी बुडणार:'रिच अंड पूअर डॅड'च्या लेखकाने दिला इशारा; म्हणाले - G, S, BC खरेदी करा...काळजी घ्या!

वॉशिंग्टन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील बँकिंग सेक्टरमध्ये आलेली सुनामी (US Bank Crisis) व त्याचा फटका यूरोपसह अन्य देशांच्या बँकांना बसल्यामुळे जागतिक मंदीचा धोका आणखी वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ सुरुवात आहे. आणखी वाईट होणे अद्याप बाकी आहे. एकीकडे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली व सिग्नेचर बँक बुडाली आहे. तर फर्स्ट रिपब्लिकसह 6 बँका बुडण्याच्या तोंडावर आहेत.

दुसरीकडे, युरोपातील क्रेडिट सुइसवरही संकटाचे ढग जमलेत. रिच अँड पूअर डॅड (Rich Dad Poor Dad) या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी क्रेडिट सुइस रसातळाला जाण्याची भविष्यवाणी केली आहे. तसेच यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याचा उपायही सांगितला आहे.

2008 ची मंदीची केली होती भविष्यवाणी

सर्वप्रथम रॉबर्ट कियोसाकी यांची माहिती जाणून घेऊया. रॉबर्ट कियोसाकी यांनी 2008 साली सर्वप्रथम लेहमॅन ब्रदर्सच्या दिवाळखोरीची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर घडलेही तसेच. त्यानंतर अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगाने भयंकर आर्थिक मंदीचा सामना केला होता. आता त्यांनी युरोपातील क्रेडिट सुइस बँक बुडणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. विशेष बाब म्हणजे स्विस नॅशनल बँकेने दिलेल्या 50 अब्ज डॉलर्सहून अधिकच्या कर्जामुळे क्रेडिट सुइसची आर्थिक स्थिती सुधारली आहे. पण बँकिंग सेक्टरमधील या सुनामीमुळे कियोसाकी यांनी नागरिकांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे.

अखेर काय आहे G,S, BC?

रिच डॅड पूअर डॅडचे लेखक आपल्या ट्विटमध्ये म्हणाले - 'आता 2 बँका बुडाल्या आहेत...आणखी बुडणार आहेत.' ते पुढे म्हणाले की, सिलिकॉन व्हॅली बँक व सिग्नेचर बँक कोसळल्यामुळे संकट आता कुठे सुरू झाले आहे. त्यामुळे G,S,BC खरेदी करा व स्वतःची काळजी घ्या. आता तुम्ही हे जी, एस, बी सी म्हणजे काय याचा विचार करत असाल. तर रॉबर्ट कियोसाकी यांनी सल्ला दिला आहे की, बँक बुडाल्याच्या स्थितीत जी अर्थात गोल्ड किंवा सोने... एस अर्थात सिल्व्हर किंवा चांदी व बीसी म्हणजे बिटक्वॉइन क्रिप्टोकरंसी यांची खरेदी करा. त्यांच्या मते, या तिन्हीमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

यापूर्वीही केलेल्या अनेक सूचना

जगभरात प्रसिद्ध व बेस्टसेलर पर्सनल फायनांस बूक रिच अँड पूअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुद्यावर नेहमीच नागरिकांना सावध करण्याचे काम करतात. यापूर्वीही त्यांनी जागतिक आर्थिक संकटाच्या स्थिती लोकांनी काय करावे व काय करू नये यासंबंधीच्या सूचना केल्या होत्या. यावेळीही आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी लोकांना अन्न, बिटकॉइन व मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

1997 मध्ये लिहिले होते 'रिच अँड पूअर डॅड'

उल्लेखनीय बाब म्हणजे वॉल स्ट्रीटचे विश्लेषक रॉबर्ट कियोसाकी आपल्या बेस्टसेलिंग बूक रिच अँड पूअर डॅड पुस्तकामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. 1977 साली त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आजही प्रसिद्ध आहे. पर्सनल फायनांसचे हे पुस्तक 100 हून अधिक देशांतील 50 हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. श्रीमंत होण्याची महत्त्वकांक्षा असणाऱ्यांनी हे पुस्तक किमान एकदा वाचावे असे मानले जाते. आतापर्यंत या पुस्तकाच्या 5 कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...