आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Rs 23 Lakh Crore Cash Freezes, GDP Falls 6%, Economic Sanctions On Russia No Effect

अर्थव्यवस्था:23 लाख कोटी रु.ची रोकड ठप्प, जीडीपी 6% घसरला, तरीही रशियावरील आर्थिक निर्बंधांचा परिणाम नाही

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांपूर्वी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. एक हजार किलोमीटर लांबीच्या आघाडीवर मृत्यू आणि विनाशाचे अंतहीन चक्र चालू आहे. त्याच्या मागे भीषण आर्थिक संघर्षाची आग धगधगत आहे. १४३ लाख कोटी रुपयांची रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी पाश्चात्त्य देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत. युक्रेन युद्धाचा निकाल या निर्बंधांच्या परिणामावर अवलंबून असेल. हे चीनसह इतर देशांविरुद्ध उदारमतवादी लोकशाहीची क्षमता आणि ताकददेखील दर्शवेल. मात्र, बंदीचा परिणाम अपेक्षेप्रमाणे दिसला नाही.

अमेरिका, युरोप आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी फेब्रुवारीपासून हजारो रशियन कंपन्या आणि व्यक्तींवर विलक्षण निर्बंध लादले आहेत. रशियाच्या ४६ लाख कोटी रुपयांपैकी निम्मी २३ लाख कोटी रुपये रोकड पडून आहेत. बहुतेक मोठ्या बँका जागतिक पेमेंट प्रणालीच्या बाहेर आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, २०२२ मध्ये रशियाचा जीडीपी ६% कमी होईल. तथापि, मार्चमध्ये १५% ची घट होण्याचा अंदाज होता. या उपायांमध्ये पाश्चिमात्य लोकांच्या मताचे समाधान करण्याबरोबरच धोरणात्मक उद्दिष्टे आहेत. सुरुवातीचे ध्येय असे होते की, रशियामध्ये रोखीचे संकट आले तर त्याला युद्धाचा खर्च उचलणे कठीण होईल. व्लादिमीर पुतीन भविष्यात इतर कोणत्याही देशावर हल्ला करू शकणार नाहीत, हे दीर्घकालीन ध्येय आहे. इतर देशांना युद्धात जाण्यापासून रोखणे हे अंतिम ध्येय आहे.

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर रशियाची आर्थिक व्यवस्था स्थिर झाली आहे. त्याला चीनसह अनेक देशांकडून पुरवठा होत आहे. दुसरीकडे, ऊर्जा संकटामुळे युरोपात मंदी येऊ शकते. रशियाने पुरवठा कमी केल्यामुळे या आठवड्यात नैसर्गिक गॅसच्या किमती २०% वाढल्या. साहजिकच निर्बंधांच्या शस्त्रामध्ये त्रुटी आहेत. हुकूमशाही सरकारे सुरुवातीच्या टप्प्यात संसाधने एकत्रित केल्यामुळे निर्बंध सहन करतात. तथापि, १०० हून अधिक देशांनी पूर्ण किंवा आंशिक निर्बंध लागू केलेले नाहीत. आशियात रशियन तेलाचा पुरवठा होत आहे. रशियन पैसा दुबईत ओतत आहे. मॉस्कोसाठी इमिरेट्स आणि इतर एअरलाइन्सची उड्डाणे दररोज उपलब्ध आहेत.

चीन या मोठ्या आणि मजबूत हुकूमशहा देशाचा निर्बंधांसह सामना करणे तर अधिक कठीण होईल. तैवानवरील हल्ला रोखण्यासाठी पाश्चिमात्य देश चीनचे २३९ लाख कोटी रुपये रोखू शकतात. त्याच्या बँका ब्लॉक करू शकतात. पण, रशियाप्रमाणेच चीनची अर्थव्यवस्थाही कोसळणार नाही. मात्र, चीनच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे अनेक देशांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल. चीन पाश्चात्त्य देशांना इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी आणि औषधांसह इतर वस्तूंचा पुरवठा बंद करेल. युक्रेन युद्धाचा धडा असा आहे की, आक्रमक हुकूमशाही सरकारांचा प्रतिकार करण्यासाठी लष्करासह अनेक आघाड्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. चांगली बातमी अशी आहे की, हल्ल्यानंतर १८० दिवसांनी युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढला आहे. युरोप गॅसचे नवीन स्रोत शोधत आहे. अमेरिका चिनी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करत आहे. तैवानला आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर चीनसह इतर हुकूमशहा देशही रशियाशी सुरू असलेल्या आर्थिक निर्बंधांच्या लढाईचा अभ्यास करून काही धडे घेत आहेत. ३ ते ५ वर्षांत दिसतील निर्बंधांचे परिणाम रशियावरील निर्बंधांचे परिणाम तीन ते पाच वर्षांत दिसून येतील. २०२५ पर्यंत सुट्या भागांमुळे २०% विमाने उड्डाण करू शकत नाहीत. दूरसंचार नेटवर्क अपग्रेड होण्यास विलंब होईल. लोकांना पाश्चिमात्य ब्रँड्स मिळणार नाहीत. पाश्चात्त्य कार कारखाने, मॅकडोनाल्ड स्टोअर्स यांसारख्या गोष्टी ताब्यात घेतल्याने सरकार समर्थक भांडवलदारांना बळ मिळेल. देश चीनचे शेपूट बनल्याने आणि हुकूमशाही वाढल्याने असंतुष्ट, काही प्रतिभावान लोक रशिया सोडू शकतात. या निर्बंधांचा रशियावर फारसा हानिकारक परिणाम झालेला नाही. दुसरीकडे, रशियाला तेल, गॅस, कोळसा यांच्या विक्रीतून यंदा २१ लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...