आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुची सोयाची खरेदी करून नफ्यात आणल्यानंतर बाबा रामदेव कंपनीची फॉलोऑन पब्लिक ऑफर घेऊन आले.यातून ते ४३०० कोटी रु. जमा करतील. आपल्या याेजनांची माहिती त्यांनी भास्करला दिली.
नुकतेच एनसीएलटीमध्ये अनेक प्रकरणे आली आहेत, ज्यात बँकांनी देणेदारीतून ९५% कमी रक्कम घेऊन कंपनी एखाद्या पक्षाला विकली. हे चुकीचे आहे, असे तुम्हाला वाटते का आणि हे बदलले पाहिजे?
हा खूप गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. आम्ही कोणत्याही वादात पडू इच्छित नाहीत. मात्र, आम्हाला वाटते की बँकांना जास्तीत जास्त पेमेंट मिळाले पाहिजे. बँकांकडे जो पैसा जमा अाहे, तो राष्ट्रीय संपत्ती आहे आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले नाही पाहिजे.
रुची सोया प्रकरणात सांगितले जाते की, बँकांनी ५३०० कोटी रुपयांचा हअरकट घेऊन तुम्हाला ४३५० कोटी रुपयांत कंपनी दिली.
हे खोटे आहे. आम्ही पारदर्शक पद्धतीने खरेदी केली. निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी केली. आमही रुची सोयासाठी जे पेमेंट केले ते आतापर्यंतच्या एनसीएलटी प्रक्रियेत सर्वात जास्त आहे. अदानीसारखे स्पर्धक होते. त्यांना लाभ दिसला असता तर त्यांनी कसे सोडले असते. आम्ही सर्वांचे तोंड बंद करू शकत नाहीत.
एफपीओ जो फंड तुम्ही जमा करत आहे त्याचा कोणता वापर करण्याची योजना आहे?
यापैकी ६०% रक्कम कर्ज फेडण्यात खर्ची जाईल. आमचा उद्देश कंपनीला कर्जमुक्त करणे आहे. उर्वरित पैशाचा वापर आम्ही कंपनीच्या विस्तारासाठी करू. आम्ही रुची सोयाला मार्केट लीडर बनवू इच्छितो.
पतंजली समूहाच्या अन्य कंपन्यांनाही शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना आहे?
रुची सोयाच्या लिस्टिंगसोबत आम्ही भांडवली बाजाराचे मार्ग खुले केले आहेत. पुढील कंपनी आम्ही पतंजलीला लिस्ट करू. मात्र, यासाठी सध्या कोणतीही कालमर्यादा निश्चित नाही.
रुची सोयासाठी तुम्ही स्वत:जवळील केवळ ११०० कोटी रु. दिले. उर्वरित ३२५० कोटी रु. तुम्हाला याच बँकांनी रुची सोयाच्या शेअर्सच्या बदल्यात कर्ज म्हणून दिले. रुची सोयाच्या शेअरची किंमत ३.५ रुपयांवरून वाढून ११०० रुपयांवर झाली. या शेअरचा एफपीओ येऊन तुम्ही ४३०० कोटी रु. जमा करत आहात. रुची सोया तुम्हाला अशी मोफत मिळाली.
मोफत असती तर अदानींनी खरेदी केली असती. एखादी एमएनसी खरेदी केली असती, तेही रांगेत होते. कंपनीचे मूल्य व्यर्थ बोलून वाढत नाही, कामगिरीने वाढते. आम्ही एक कमोडिटी कंपनीला एफएमसीजी कंपनीत रूपांतरित केले. पतंजलीने आपली ब्रँड व्हॅल्यू यामध्ये टाकली. स्वामी रामदेव यांनी आपली फेसव्हॅल्यू यात टाकली. या कंपनीच्या मूल्यासाठी पतंजलीने अापले सर्वकाही टाकले, तेव्हा कुठे हे मूल्य झाले. जे असे बोलत आहेत ते सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय गुन्हा करत आहेत. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.