आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Rules To Change From 1st October; Pensioners Life Certificate To Debit Card, Credit Card Payment

कामाची बातमी:गॅस सिलिंडरचे दर आजपासून वाढले, नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीमही लागू; 1 ऑक्टोबरपासून झाले हे 6 मोठे बदल

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या याविषयी...

आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून देशभरात अनेक बदल झाले आहेत. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम आजपासून लागू करण्यात आली आहे. याशिवाय अलाहाबाद, ओबीसी आणि युनायटेड बँकेचे जुने चेकबुक चालणार नाहीत. आम्ही तुम्हाला अशा 6 बदलांविषयी सांगत आहोत ज्याचा सामान्यांवर परिणाम होईल.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 43.5 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे
सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर 43.5 रुपयांपर्यंत वाढवली आहे. सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1693 रुपयांवरून 1736.5 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

तेल कंपन्यांनी सामान्य माणसाच्या वापरासाठी 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपये कायम आहे. गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केली होती.

नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम लागू झाली
नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. ऑटो डेबिटचा अर्थ असा की, तुम्ही मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यातून वीज, एलआयसी किंवा इतर कोणतेही खर्च ऑटो डेबिट मोडमध्ये समाविष्ट केले असतील, तर एका विशिष्ट तारखेला बँक खात्यातून पैसे आपोआप कापले जातील.

अलाहाबाद, ओबीसी आणि युनायटेड बँकेचे जुने चेक बुक चालणार नाही
1 ऑक्टोबरपासून अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँकेचे जुने चेकबुक निरुपयोगी होतील. ओबीसी आणि युनायटेड बँक पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये विलीन झाली आहे. तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. अशा स्थितीत या बँकांच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घ्यावे
लागेल.

डीमॅट खात्यासाठी केवायसी आवश्यक
मार्केट रेगुलेटर सेबी (SEBI) ने नवीन ट्रेडिंग आणि डिमॅट खाती उघडण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार आता ट्रेडिंग आणि डीमॅट खात्याचे केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. आतापासून जर केवायसी अपटेड केले नाही तर डीमॅट खाते निष्क्रिय केले जाईल.

यामुळे तुम्हाला शेअर बाजारात ट्रेड करता येणार नाही. जरी एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर हे शेअर्स खात्यात ट्रान्सफर करता येणार नाहीत. केवायसी पूर्ण आणि पडताळणी केल्यानंतरच हे केले जाईल.

घरबसल्या बनेल लाइफ सर्टिफिकेट
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) बनवण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे, जी 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू आहे. याच्या मदतीने लोक घरी बसून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) मिळवू शकतील. Jeevanpramaan.gov.in/app वर जाऊन तुम्ही हे करू शकता.

FSSAI क्रमांकाचा उल्लेख बिलावर करावा लागेल
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने खाद्यपदार्थांचे व्यवहार करणाऱ्या सर्व दुकानदारांना नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. 1 ऑक्टोबरपासून खाद्यपदार्थांशी संबंधित दुकानदारांना मालाच्या बिलावर FSSAI नोंदणी क्रमांक लिहिणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, दुकानापासून ते रेस्तराँपर्यंत डिस्प्लेमध्ये ते कोणते खाद्यपदार्थ वापरत आहेत ते सांगावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...