आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:डॉलरच्या तुलनेत रुपयात किरकोळ घसरण

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया हा आधीच्या भक्कम स्थितीमुळे किरकोळ घसरणीने बंद झाला.जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील तीव्र घसरणीचा परिणाम देशांतर्गत समभागांनी भरून काढला.

परदेशात अमेरिकन चलनाला मिळालेली बळकटी आणि सतत बाहेर जाणारा परकीय निधीचा प्रवाह याचा परिणामही रुपयावर झाला. चलन बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत किंचित वाढून ७६.४८ वर उघडला आणि ७६.३५ पर्यंत त्याने आणखी मजल मारली. रुपया शेवटी ७६.५१ वर स्थिरावला. रुपयात किरकोळ १ पैशाची घसरण झाली.

बातम्या आणखी आहेत...