आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर मार्केट:रुपया दुसऱ्या दिवशी 9 पैशांनी वधारून 77.25 वर

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉलरने त्याच्या २० वर्षांच्या उच्चांकी पातळीपासून माघार घेतल्याने आणि रोखे उत्पन्न ३ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यामुळे बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी रुपया ९ पैशांनी वाढून ७७.२५ वर स्थिरावला. फ्युचर्स मार्केटमध्ये आरबीआयच्या हस्तक्षेपाचा संशय आणि अमेरिकेची महत्त्वाची महागाईची आकडे जाहीर होण्‍यापूर्वी बहुतांश चलनांमध्ये फारसे व्यवहार न झाल्याने रुपयाला आधार मिळाला.चलन बाजारात रुपया डाॅलरच्या तुलनेत ७७.२४ वर उघडला आणि ताे दिवसभरात ७७.१७ आणि ७७.३१ या पातळीत फिरला.

दिवसअखेर रुपया ९ पैशांनी वाढून ७७.३४ वर स्थिरावला.”भारतीय रुपया नफा आणि तोटा दरम्यान दिसत आहे कारण अमेरिकेचे १० वर्षांचे उत्पन्न ३ % खाली आले आहे. चीनमध्ये कमी कोविड प्रकरणे नोंद झाली आहेत. शांघायमध्ये मंगळवारी ५१ % कमी प्रकरणे नोंदवली गेली. चीनमधील लॉकडाऊन कमी करण्याच्या शक्यतेबद्दल गुंतवणूकदारांना काहीसे आशावादी बनवले आहे असल्याचे शेअरखानच्या मूलभूत चलनांचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कमोडिटी विश्लेषक प्रवीण सिंग यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...