आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Russia Ukraine Share Of Wheat Supply Will Exceed 100 Lakh Tonnes This Fiscal Year: Goyal|Marathi News

दिव्य मराठी विशेष:रशिया-युक्रेनचा गव्हाच्या पुरवठ्यापैकी एक चतुर्थांश वाटा, या आर्थिक वर्षात गव्हाची निर्यात 100 लाख टनांचा टप्पा ओलांडेल : गोयल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बाजारपेठेतील कमोडिटीच्या वाढत्या मागणीमुळे २०२२ -२३ या वर्षामध्ये देशाची गव्हाची निर्यात १०० लाख टनांचा (१० दशलक्ष टन) टप्पा ओलांडण्याची शक्यता वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली आहे

२०२०-२१ मधील २१.५५ लाख टनांच्या (४,००० कोटींपेक्षा अधिक) तुलनेत २०२१-२२ मध्ये निर्यात ७० लाख टन (१५,००० काेटी रुपये) ओलांडली आहे. २०१९-२० मध्ये ते केवळ दोन लाख टन (५०० कोटी रुपये) िनर्यात झाली हाेती. गाेयल म्हणाले की गव्हाच्या निर्यातीमुळे अनेक देशांना अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यात मदत झाली आहे.

“आम्ही मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात करणे सुरू ठेवू आणि ज्या देशांना संघर्ष क्षेत्रातून त्यांचा पुरवठा होत नाही त्यांच्या गरजा पूर्ण करू . आपण कदाचित १०० लाखांपेक्षा जास्त गहू निर्यात सहज करू शकू असे माझे स्वतःचे मत आहे असेही त्यांनी सांगितले. रशिया आणि युक्रेनचा मिळून जागतिक गव्हाच्या पुरवठ्यापैकी जवळपास एक चतुर्थांश वाटा आहे. त्यांचे गव्हाचे पीक यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये परिपक्व होईल.शेतकरी उत्पादन वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करत आहेत आणि गुजरात आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांतून गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.

विदेश व्यापार महासंचालक (डीजीएफटी) संतोष कुमार सारंगी यांनी सांगितले की, वाणिज्य आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या वतीने इतर बंदरांमधून निर्यात सुलभ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

जागतिक निर्यातीत भारताचा वाटा १ % पेक्षाही कमी जागतिक गव्हाच्या निर्यातीत भारताचा वाटा १ टक्क्यांहूनही कमी आहे. तथापि, हा वाटा २०१६ मध्ये ०.१४ टक्क्यांवरून २०२० मध्ये ०.५४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. भारत हा गव्हाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. २०२० मध्ये जगाच्या एकूण उत्पादनात त्याचा वाटा सुमारे १४.१४ टक्के होता. भारतात दरवर्षी सुमारे १०७.५९ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होते, तर त्याचा मोठा हिस्सा देशांतर्गत वापरासाठी जातो. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान ही भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...