आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Russia Ukraine War EffectUkraine Russia Waar | Marathi News | War Raises Petroleum And Edible Oil Prices By 25 Per Cent; Oil From Ukraine And Russia Will Be Affected

तेलाला उकळी:युद्धामुळे पेट्रोलियम व खाद्यतेल 25 टक्क्यांनी महागण्याची भीती; युक्रेन, रशियातून येणाऱ्या तेलावर होणार परिणाम

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाला उकळी फुटली असून त्याचा सर्वात जास्त परिणाम भारतावर हाेणार आहे. देशातील खाद्य आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये १०-२५ टक्के वाढ हाेण्याची शक्यता आहे. वास्तविक भारत गरजेपेक्षा जवळपास ६०% खाद्यतेल आणि ८० % पेक्षा जास्त कच्चे तेल आयात करताे. युद्धामुळे या देशांतून पुरवठा थांबल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीत वेगाने वाढ हाेण्यास सुरुवात झाली आहे. एसबीआयने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल गेल्या महिन्यात २१%पेक्षा जास्त महाग झाले आहे. युद्धामुळे ब्रेंट क्रूड प्रतिडॉलर १०५ बॅरलवर गेले आहे. पुढील दिवसात यात आणखी तेजीची शक्यता आहे. युद्धामुळे भारत युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची खरेदी करू शकत नाहीये. जवळपास ३.८० लाख टन सूर्यतेलाचा माल युक्रेन बंदरावर अडकून पडला आहे. युक्रेनची बंदरे बंद झाली आहेत. देशात वर्षाला २५ लाख टन सूर्यफूल तेलाचा वापर हाेताे.

किमती किती वर जातील याचा अंदाज लावता येत नाही
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता म्हणाले, सध्याच्या परिस्थितीमध्ये खाद्यतेलाच्या किमती सध्याच्या पातळीवरून नेमक्या कोणत्या पातळीवर जातील याचा अंदाज आम्ही बांधू शकत नाही.

१४ रुपये प्रतिलिटरपर्यंत महाग हाेणार पेट्रोल-डिझेल

व्हॅट सध्याच्या रचनेनुसार कच्चे तेल जर १०० रुपये प्रतिबॅरलवर गेले तर राज्यातील निवडणुकांनंतर देशात पेट्राेल - डिझेलच्या किमती ९ रुपयांनी वाढतील. कच्चे तेल ११० रुपयांवर गेले, तर पेट्राेल-डिझेल १४ रुपये प्रतिलिटरने महाग हाेईल. पुढील आर्थिक वर्षात पेट्रोल - डिझेलचा वापर ८-१० % वाढला, तर सरकारला सुमारे ९५,००० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञ साैम्यकांती घाेष म्हणाल्या.

सूर्यफूल तेलाची आयात

एप्रिल/मार्च 20-21 19-20 एकूण आयात 22 25 युक्रेनवरून आयात 19.3 17.4 रशियावरून आयात 2.8 3.8 अर्जेंटिनाहून आयात 1.4 1.7

(आयातीचे आकडे लाख टनांमध्ये स्रोत : वाणिज्य मंत्रालय)

भारतातील खाद्यतेलाचा वापर

पाम तेल 85 सोयाबीन तेल 45 सरसू तेल 30 सूर्यफूल तेल 25

युद्ध छेडण्याआधीच वाढू लागलेल्या आयात तेलाच्या किमती

कालावधी सूर्यफूल पाम सोया २३ फेब्रुवारी 1,630 1,810 1,777 १आठवडा आधी 1,500 1,545 1,472 १ महिना आधी 1,455 1,626 1,089 १ वर्ष आधी 1,400 1,460 1,126 (भाव डॉलर प्रतिटन, मुंबई बंदरातील)

बातम्या आणखी आहेत...