आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Russia Ukraine War Raises Car Prices, Lowers Production, Russia Ukraine War Affects Global Auto Industry| Marathi News

रशिया-युक्रेन युद्ध परिणाम:रशिया-युक्रेन युद्धामुळे गाड्यांच्या किमती वाढणार, उत्पादन घटणार, जागतिक वाहन उद्योगाला युद्धाचा मोठा फटका

डेट्रॉइट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरवठा साखळीतील अडचणींचा सामना करत असलेल्या जागतिक वाहन उद्याेगावर रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम झाला अाहे. सर्वात जास्त परिणाम युराेपवर झाला अाहे. बीएमडब्ल्यूने दाेन जर्मन कारखान्यांमधील उत्पादन थांबवले अाहे. मर्सिडीझने जुळवणी प्रकल्पातील उत्पादन कमी केले असून सुटे भाग मिळत नसल्याने फाेक्सवॅगेन उत्पादन थांबवण्याचा विचार करत अाहे. गेल्या आठवड्यात रेनॉल्ट या फ्रेंच कंपनीने रशियातील उत्पादन थांबवणार असल्याचे सांगितले. रशियामध्ये उत्पादन सुरू ठेवणारी रेनॉल्ट ही शेवटची परदेशी ऑटोमोबाइल कंपनी आहे. मात्र यादरम्यान जगभरातील वाहनांची मागणी कमी झालेली नाही. पण उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे दरवाढ कायम राहणार असल्याचे चित्र आहे.वास्तविक युक्रेन युराेपला १०% ते १५ % इलेक्ट्रिक वायरिंगची निर्यात करताे. युद्धामुळे निर्यातीवर त्याचा परिणाम झाला अाहे.

बातम्या आणखी आहेत...