• Home
  • Business
  • Sale of clothes, footwear, electronics halts livelihood of Rs 3 crore: RAI CEO

इंटरव्ह्यू / कपडे, पादत्राणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री बंद राहिल्याने २.५ कोटींच्या उपजीविकेवर परिणाम : आरएआय सीईओ

  • एमएसएमईमध्ये नसल्यामुळे रिटेल विक्रेत्यांना दिलासा मिळला नाही

दिव्य मराठी

May 21,2020 08:58:00 AM IST

नवी दिल्ली. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात बहुतांश राज्यांत दुकाने सुरू झाली आहेत. मात्र, अद्यापही शॉपिंग मॉल्स बंद आहेत. यामुळे मॉलमधील रेस्तराँ आणि किरकोळ विक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया(आरएआय)ने ही स्थिती पाहता सरकारला विनंती केली की, त्यांनाही होम डिलिव्हरी आणि ई-रिटेल संस्था म्हणून काम करण्यास परवानगी दिली जावी. आरएआयचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, कोरोना महारोगराई आणि त्यातून निर्माण झालेल्या संकटांवर चर्चा केली.

> रिटेल इंडस्ट्रीसमोर आव्हान कोणते आहे?

कोरोना संकटाच्या सुरुवातीस रिटेल इंडस्ट्रीचा आकार १५% राहिला होता. अत्यावश्यक नसलेल्या वस्तू, उदा. कपडे, दागिने, पादत्राणे आणि सीडीआयटी(इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, आयटी आणि टेलिफोन)च्या रिटेल विक्रेत्यांसाठी ही घट १००% आहे.

> रिटेल उद्योगात आतापर्यंत किती लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा अंदाज आहे?

रिटेल उद्योग जवळपास ४ कोटी ६० लाख लोकांना रोजगार देतो आणि त्यामुळे २५ कोटी भारतीयांची उपजीविका चालते. अनावश्यक वस्तूंची विक्री बंद झाल्याने दोन ते अडीच कोटी कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. रिटेलपासून अन्य क्षेत्र उदा. मॅन्युफॅक्चरिंग, करमणूक आणि कारागिरांवरही गंभीर परिणाम झाला.रिटेल १ लाख नोकऱ्या गमावत असेल तर यामुळे ५० ते ६० लाख उपजीविकांवर परिणाम करते.

> सरकारी पॅकेजचा काय परिणाम होईल?

रिटेलसमोरील आव्हानांचे अद्याप निराकरण केले नाही. रिटेल विक्रेत्यांना मजुरी देण्यासाठी मदत आणि खेळत्या भांडवलावर हप्ता सवलतीची आवश्यकता होती. एमएसएमईला दिलेली मदत रिटेल विक्रेत्यांसाठी नाही, कारण रिटेल या क्षेत्राअंतर्गत येत नाही.

रिटेलसमोरील आव्हानांचे अद्याप निराकरण केले नाही. रिटेल विक्रेत्यांना मजुरी देण्यासाठी मदत आणि खेळत्या भांडवलावर हप्ता सवलतीची आवश्यकता होती. एमएसएमईला दिलेली मदत रिटेल विक्रेत्यांसाठी नाही, कारण रिटेल या क्षेत्राअंतर्गत येत नाही.

> मजुरांचे स्थलांतर झाल्याने रिटेल व्यवसायावर किती परिणाम होईल?

ऑफलाइन स्टोअर्सवर वॉक-इन ग्राहक, होम डिलिव्हरी व्यवस्थापन करणे कठीण झाले.

> शॉपिंग मॉल्स उघडल्यास गर्दीचे व्यवस्थापन कसे होईल?

मॉल्समध्ये सोशल डिस्टन्सिंग शक्य आहे. जिथे पुरेशी स्वच्छता आणि अंतर नसेल तिथे ग्राहक जाण्यास इच्छुक नसतील.X