आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहनिर्माण बाजारपेठ:घरांच्या किमतीसह व्याजदर वाढल्यामुळे विक्रीमध्ये घट

स्टिफनोस चेन20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील प्रॉपर्टी मार्केट नवीन वळण घेत आहे. व्याजदरात झालेली वाढ आणि महागाई वाढल्याने हे बदल झाले आहेत. व्याजदर सात टक्क्यांपर्यंत वाढले आहेत, ते २०२२ नंतरचे सर्वाधिक आहे. ऑक्टोबरमध्ये सरासरी खरेदीदाराला मागील वर्षाच्या तुलनेत त्याच्या गृहकर्जावर दरमहा ७७ टक्के जास्त पैसे द्यावे लागले. १० टक्के डाउन पेमेंटसह ४ लाख २५ हजार डाॅलरच्या मध्यम किमतीच्या घरासाठी दरमहा अतिरिक्त १११७ डाॅलर भरावे लागतील.

नॅशनल रिअल्टर्स असोसिएशनच्या मते, मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये सलग चौथ्या महिन्यात घरांच्या खरेदीच्या करारामध्ये ३१ टक्के घट झाली आहे. दुसरीकडे गुगल ट्रेंड्सच्या डेटानुसार, यूएस हाऊसिंग बबलच्या नावावर १५ वर्षांमध्ये सर्वाधिक शोध झाला. इडाहो राज्यात सर्वाधिक शोध झाला आहे. बोईस शहरातील मध्यमवर्गीय घरांची किंमत ४ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त होती. सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत ही ५१% वाढ आहे. बाजार झपाट्याने थंड होत असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे काही काळानंतर घरांच्या किमती घसरतील, पण खरेदीदारांच्या अपेक्षेपेक्षा कमी होतील. भाडेकरूंना दिलासा मिळू शकतो.

बहुतांश तज्ज्ञांना घरांच्या किमती २००८ मध्ये होत्या तितक्या कमी होण्याची अपेक्षा नाही. त्या वेळी घरांच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. रोख खरेदी करणाऱ्यांचा नवा वर्ग उदयास आला होता. त्यात घट होणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. डोंगराळ पश्चिमेकडील प्रदेश आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी घट होऊ शकते. या भागात मालमत्तेचे भाव सर्वाधिक होते. डिसेंबर २०१९ ते जून २०२२ दरम्यान घरांच्या किमतीत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतक्या कमी कालावधीतील हा सर्वात मोठा फायदा होता. या वर्षी जुलैमध्ये ०.३ टक्क्यांची किरकोळ घट झाली आहे. तरीही किमती जुलै २०२१ च्या तुलनेत १५.८ टक्क्यांनी जास्त आहेत.

किंमत ७% कमी होईल मॉर्गन स्टॅन्ले गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीचा अंदाज आहे की, डिसेंबर २०२३ मध्ये किमती जून २०२२ च्या शिखरापेक्षा सात टक्क्यांनी कमी होतील. मूडीज अॅनालिटिक्सनुसार जून ते २०२४ पर्यंत १० टक्के घट होईल. मंदी आली तर किमती २० टक्क्यांपर्यंत घसरू शकतात.

बातम्या आणखी आहेत...