आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोराेना काळ:लोक घरी राहिल्याने वाढतेय रेडी-टू-कुकची विक्री, पराठ्यांची विक्री 60%, मांस विक्री 300% वाढली

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेडसीर कन्सल्टिंग अँड रिसर्चनुसार जून तिमाहीत घरी स्वयंपाक करण्याचा 61 टक्के खर्च वाढला

कोरोना संकटामुळे लोक घरातून काम करत आहेत. या दरम्यान ते केवळ स्वयंपाकघरात जेवण बनवण्याचा छंद पूर्ण करत आहेत, तर रेडी-टू-कुक पदार्थ बनवून घराबाहेरच्या जेवणाचा आनंदही लुटत आहेत. यामुळे एप्रिलपासून जूनच्या तिमाहीत रेडी-टू- कुक आणि रेडी-टू- इट फूड प्रोडक्ट्सच्या विक्रीत विशेष वाढ पाहायला मिळाली आहे. ताजा पॅकेज्ड फूड ब्रँड आयडी फ्रेश फूडची पराठे विक्री यामुळे गेल्या तिमाहीच्या तुलनेत ६०% पर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, मांस उत्पादन आणि सीफूड ब्रँड लीशसच्या रेडी-टू- इट मांसाची विक्री ३००% पेक्षा जास्त वाढली आहे. रेडी-टू- इट कबाब, मसालेदार मांस आणि सी फूडच्या विक्रीत दुपटीपर्यंत वाढ झाली आहे. रेडसीर कन्सल्टिंग अँँड रिसर्चनुसार, एप्रिल ते जूनच्या तिमाहीत घरी स्वयंपाक करण्यावरील खर्चात ६१% ची वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण, कोरोना संसर्ग वाढल्याने घराबाहेर जेवणाची उपलब्धता कमी होणे आहे. रेडी-टू-हीट श्रेणीत इडलीचे पीठ आणि पनीरच्या विक्रीत मोठी वाढ नोंदली आहे. आयडी फ्रेशमध्ये अशा पदार्थांची विक्री गेल्या तिमाहीत २०% पर्यंत वाढली आहे. लीशसचे सहसंस्थापक विवेक गुप्ता म्हणाले, गेल्या तीन महिन्यांत घरी भोजन तयार करणे आणि खाणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ग्राहक चांगला दर्जा आणि सुरक्षित पदार्थ उत्पादन घेणे पसंत करत आहेत. त्यांच्यात झालेला हा बदल दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. अमूल ब्रँडच्या मालकीची गुजरातच्या कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन(जीएसएमएमएफ)च्या रस मलाईसारख्या पाकीटबंद मिठाईची विक्री वाढली आहे. जीसीएमएमएफचे एमडी आरएस सोधी म्हणाले, ग्राहकांच्या प्राधान्यक्रमात आलेला बदल पाहता, अशा पदार्थांच्या उत्पादनासाठी नवा प्लँट स्थापन केला जात आहे, जो आतापर्यंत अंशत: पद्धतीने तिसऱ्या पक्षाकडून तयार केला जात होता. गेल्या काही महिन्यांत अमूलने जी उत्पादने बाजारात आणली आहेत, त्यात हळदीचे दूध, पंचामृत, रस मलाई आणि गुलाब जामूनसारख्या मिठाईचा समावेश आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत ग्राहकांची आवड बदलली आहे. मात्र, कोरोना काळात याचा वेग वाढला आहे. सोधीनुसार, अशा उत्पादनाच्या मागणीचा एक मोठा हिस्सा लहान शहरांतून येतो, जिथे लोक पारंपरिक पद्धतीने घरी स्वयंपाक करणे वा बाहेरचे जेवण पसंत करतात. आधी ग्राहक हिरवे वाटाणेबाबत जाणून होते.

बिगबास्केट, ग्रोफर्स, अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांपेक्षा दुप्पट व्यवसाय

आयडी फ्रेशचे सहसंस्थापक पी. सी. मुस्तफा म्हणाले, बिगबास्केट, मिल्कबास्केट, ग्रोफर्स, अॅमेझॉन आणि सुपर डेलीसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे आपला व्यवसाय दुप्पट झाला आहे. ग्रोफर्सचे सहसंस्थापक सौरभ कुमार यांच्यानुसार त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रेडी-टू-कुक आणि रेडी-टू-इट पदार्थांची विक्री १.७ पट वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...