आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात बॅटरीवर चालणारी वाहने म्हणजे ईव्हीचा दबदबा वेगाने वाढत आहे. वाहनांच्या किरकोळ विक्रीचा कल याबाबत स्पष्ट संकेत देत आहे. गुरुवारी जाहीर आकडेवारीनुसार, जुलैत सामान्य वाहनांची विक्री वार्षिक आधारावर ८% घटली तर कारच्या विक्रीत ५% टक्के घट झाली. दुसरीकडे ईव्हीच्या विक्रीत वार्षिक आधारे २००% ची मोठी वाढ झाली. मासिक आधारावरही ९% जास्त ईव्ही विकल्या गेल्या. ऑटोमोबाइल डीलर्सची संघटना फाडानुसार, गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात एकूण १४,३६,९२७ वाहनांची विक्री झाली. त्याच्या तुलनेत जुलै २०२१ मध्ये १५,५९,१०६ वाहने विक्री झाली होती. दरम्यान, प्रवासी वाहनांची (मुख्यत्वे कार) विक्री २,६३,२३८ वरून घटून २,५०,९७२ युनिटवर आली. तसेच गेल्या महिन्यात १०,०९,५७४ दुचाकी विकल्या, ज्या गेल्या वर्षी जुलैत झालेल्या ११,३३,३४४ दुचाकी विक्रीपेक्षा ११% कमी आहेत.
पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या उलट ईव्हीची विक्री वेगाने वाढली. जेएमके रिसर्च अँड अॅनालिटिक्सच्या एका अहवालानुसार जुलैत ७९,७२० ईव्ही विकल्या गेल्या. हे गेल्या वर्षी जुलैतील विक्रीच्या तुलनेत २००% पेक्षा जास्त आहे. जूनच्या तुलनेत जुलैत ८.८% जास्त ईव्हीची विक्री झाली आहे. जुलै २०२१ मध्ये २६,१२७ ईव्ही विक्री झाली होती, तर या वर्षी जूनमध्ये ७३,२५७ ईव्ही विकल्या गेल्या होत्या.
यूपी, महाराष्ट्रात सर्वाधिक विकल्या ईव्ही गेल्या महिन्यात ईव्हीच्या एकूण विक्रीत सर्वाधिक १८% वाटा उत्तर प्रदेशचा होता. १२% वाटा मिळवत महाराष्ट्र याबाबत दुसऱ्या क्रमांकावर होता. राजस्थान, कर्नाटक आणि गुजरातचा वाटा ८--८% आणि दिल्लीचा वाटा ७% होता. तामिळनाडूतही गेल्या महिन्यात ६% ईव्ही विकल्या गेल्या.
२०२५ पर्यंत प्रत्येक १०वी कार इलेक्ट्रिक असेल
ऑटोमाेबाइल एक्स्पर्ट संजीव गर्ग यांचे अनुमान आहे की, ईव्हीचा वापर वेगाने वाढत राहील. त्यांनी सांगितले की, २०२५ पर्यंत देशात एकूण कार विक्रीत १०% वाटा ईव्हीचा होईल, जो सध्या १.५% च्या जवळपास आहे. कारण फक्त महागडे पेट्रोल-डिझेल नाही तर जास्त रेंजच्या चांगल्या दर्जाच्या कार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.