आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेची चिंता:जून तिमाहीत स्मार्ट सिक्युरिटी कॅमेऱ्यांची विक्री दुप्पट

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांत देशात घराच्या सुरक्षेसाठी डिजिटल उपकरणांचा वापर वाढला आहे. एप्रिल-जून तिमाहीत, स्मार्ट होम सिक्युरिटी कॅमेऱ्यांची बाजारपेठ वार्षिक ११६% वाढली म्हणजेच दुप्पट वाढली. मार्च तिमाहीच्या तुलनेत त्यात ७% वाढ झाली. सिक्युरिटी कॅमेऱ्यांची किंमतही अर्ध्यापासून म्हणजे २५०० रुपयांपासून सुरू झाली. आता एका युनिटची किंमत १०-१५ हजार आहे. पूर्वी त्याची किंमत ४० ते ५० हजार रुपये असायची. डेटा रिसर्च एजंसी काउंटर पॉइंटच्या मते, घरांच्या सुरक्षिततेसाठी डिजिटल साधनांचा वापरांमध्ये जागरुकता येणे याचे सर्वात मोठे कारण आहे. शिवाय वर्क फ्रॉम होम करणारे बहुतांश लाेक आता ऑफिसमध्ये जायला लागले अाहेत. त्यामुळे घराच्या सुरक्षेकडे आता लोकांचे लक्ष वाढले आहे. २०२० मध्ये देशातील सुरक्षा आणि पाळत ठेवण्याची बाजारपेठ सुमारे २० हजार कोटींची होती, जी आता ४० हजार कोटींहून अधिक झाली.

बातम्या आणखी आहेत...