आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी वाढली:क्रीडा साहित्याची विक्री 18%, तर दागिन्यांची 10% वाढली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात नोव्हेंबरमध्ये रिटेल व्यापारात थोडी घट बघायला मिळते. परंतु यावर्षी तसे झाले नाही. अमेरिकेसह बहुतांश विकसित देशांत गेल्या महिन्यात किरकोळ व्यापारात मंदी आली. दुसरीकडे भारतात किरकोळ व्यवसाय गेल्या वर्षीच्या तुलनेत ६% आणि कोरोनापूर्व म्हणजे नोव्हेंबर २०१९ च्या तुलनेत १५% वाढला आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, गेल्या महिन्यात क्रीडा साहित्याची विक्री सर्वाधिक वाढली. फीफा वर्ल्ड कपशिवाय क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स आणि शाळा व महाविद्यालयस्तरीय क्रीडा स्पर्धांमुळे क्रीडा साहित्याच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १८% वाढ दिसली. तर कोरोनापूर्व म्हणजे २०१९ च्या तुलनेत यात २४% वाढ झाली. गेल्या महिन्यात पश्चिम भारतात रिटेल व्यवसाय २०२१ च्या तुलनेत सर्वाधिक ८% वाढला. उत्तर भारतात रिटेल व्यापारात ४% ची जुजबी वाढ झाली. तर पूर्व भरत ५% आणि दक्षिण राज्यांत ६% वाढ झाली.

कंझ्युमर ड्युरेबल्सच्या विक्रीत ९% वाढ गट वाढ (2019) (2021) स्पोर्ट‌्स गुड्स 24% 18% क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट 12% 13% ज्वेलरी 23% 10% फूड अँड ग्रॉसरी 13% 10% कंझ्युमर ड्युरेबल्स 14% 9% फुटवेअर 29% 8% फर्निचर अँड फर्निशिंग 8% 8% अपॅरल अँड क्लोदिंग 14% 7%

बातम्या आणखी आहेत...