आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली:जीएसटी करवसुलीत सांगली जिल्हा प्रथम

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातच नव्हे तर देशातील जीएसटी कर वसुलीत सांगली जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकवला आहे. मे महिन्यातील जीएसटी कराची वाढ १०० टक्के तर राज्यात ही वाढ ५० टक्के तर देशपातळीवर ४४ टक्के झाली आहे.

सांगली जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी ५० ते ५२ कोटी रूपयांची वसुली होते. मात्र मे महिन्यात ती १०४ कोटी रूपये झाली आहे. एप्रिल-मे २०२१ मध्ये जीएसटी संकलन १३७ कोटी रूपये होते. ते यावर्षी २१६ कोटी रूपये झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जीएसटी महसूलात ७९ कोटीची वाढ झाली आहे. वाढीचे हे प्रमाण ५८ टक्के आहे. सांगली जिल्ह्यातील जीएसटी वसुलीत साखर उत्पादनाचा सर्वाधिक हिस्सा होता. आता या महसुलात फाँन्ड्री उद्योगाने साखर उद्योगाला मागे टाकले आहे. जिल्ह्यातील जीएसटीची कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई बनावट बिले तयार करणार्‍या विरोधात तातडीने कारवाई आणि बोगस नोंदणी करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे नोंद करण्याचा धडाकाच सुरु केल्याने जीएसटी महसुलाचे संकलन वाढले आहे. असे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...