आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Sanjay Raut On Budget 2021: Sanjay Raut Demands Middle Class Focussed Budget Latest News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्प 2021:उद्योगांवर केंद्रीय यंत्रणांचा फास ढिला करा, गरीबाला आणखी गरीब करू नका; खासदार संजय राउत यांचे आवाहन

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने गरीब आणि मध्यमवर्गियांना दिलासा मिळेल अशाच घोषणा व्हायला पाहिजे. गरीब आणखी गरीब होऊ नये असे आवाहन शिवसेना खासदार संजय राउत यांनी केले आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ते सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

उद्योजक आणि कारखान्यांवर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे असे संजय राउत यावेळी बोलताना म्हणाले आहेत. देशातील उद्योगांना मुक्तपणे व्यापार करता यावा, त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा फास ढिला करावा जेणेकरून देशातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात मदत होईल असे त्यांनी सांगितले.

जीएसटीवरून केंद्राला टोला
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राउत यांनी केंद्रावर जीएसटीच्या मुद्द्यावरून टोला लगावला. वस्तू आणि सेवा कर (GST) मार्फत गोळा केलेल्या करातून केंद्राने महाराष्ट्राचे पैसे देणे आहेत. महाराष्ट्राला त्यांनी ते लवकरात लवकर परत करावे. एवढेच नव्हे तर कोरोनाविरोधात आलेली लस सर्वांनाच मोफत देण्यात यावी अशी मागणी संजय राउत यांनी केली आहे.