आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. ही भाववाढ मेपासून फक्त आशिया खंडातील देशांसाठी असणार आहे. याचा यूरोपमधील राष्ट्रांवर परिणाम होणार नाही. सौदी अरेबियाकडून तेल आयात कमी करण्याच्या भारताच्या योजनेवर कोणताही परिणाम झाला नाही, असे संकेत मिळाले आहेत.
प्रति बॅरल 20 ते 50 सेंट वाढ
रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाने अधिकृत विक्री किंमती म्हणजेच OSPमध्ये 20 ते 50 सेंट प्रति बॅरल वाढ केली आहे. कच्च्या तेलाच्या वेगवेगळ्या ग्रेडनुसार ही वाढ करण्यात आली आहे. सौदी अरेबिया कराराच्या अटींनुसार दर महिन्याला OSP बदलतो. तर अन्य पश्चिम आशियाई देशांनी त्यांच्या कच्च्या तेलाच्या किंमतीत कपात करण्याचे संकेत दिले आहेत.
सौदीकडून तेल आयात कमी करण्यासाठी भारताची सरकारी कंपन्यांना विनंती
सौदी अरेबियातून कच्च्या तेलाची कमी आयात करावी, अशा सूचना भारत सरकारने सरकारी तेल कंपन्यांना दिल्या आहेत. कच्च्या तेलाच्या भाववाढीमुळे भारत आणि सौदी अरेबियात तणाव निर्माण होऊ लागला आहे. तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी क्रूड ऑईल उत्पादक देशांनी उत्पादनावरील बंदी उठवावी अशी भूमिका भारताने घेतली आहे. परंतु ओपेक प्लस देशांनी भारताच्या या मागणीकडे लक्ष दिले नाही. सौदी अरेबियाचे तेलमंत्री अब्दुल एजाज बिन सलमान यांनी म्हटले होते की, भारताने स्वस्त दरात खरेदी केलेल्या कच्च्या तेलाचा वापर करावा.
याचा नकारात्मक परिणाम भारतावर होईल
आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (चलन व ऊर्जा संशोधन) अनुज गुप्ता म्हणतात की, सौदी अरेबियाच्या निर्णयाचा भारतावर नकारात्मक परिणाम होईल. गुप्ता यांच्या मते, भारत सुमारे 85% क्रूड ऑईल इतर देशांतून आयात करतो. त्यात सौदी अरेबियाचा मोठा वाटा आहे. सौदीकडून किंमती वाढल्यामुळे भारताला महाग क्रूड ऑईल खरेदी करावे लागणार आहे. याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरही होऊ शकतो. तथापि, सौदीकडून क्रूड ऑईलची कमी खरेदी करण्याच्या दृष्टीने भारत काम करत आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होऊ शकतात?
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, 'लवकरच पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किंमती कमी होऊ शकतात. धर्मेंद्र म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमत कमी झाल्यास आम्ही ग्राहकांना त्याचा पूर्ण लाभ देऊ. शब्द दिल्याप्रमाणे आम्ही ग्राहकांना लाभ देणे सुरू केले आहे. कच्चे तेल प्रति बॅरल 63 डॉलर आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.