आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11वी गुंतवणूक:जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 2.32% भागीदारीसाठी 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल सौदी अरबचा पीआयएफ

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिओ प्लॅटफॉर्म्सला आतापर्यंत 24.70 टक्के भागीदारीसाठी 1.15 लाख कोटी रुपये मिळाले आहेत
  • पीआयएफ जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणारी दहावी कंपनी, फेसबूकची सर्वात मोठी गुंतवणूक

सौदी अरबचा वेल्थ फंड पब्लिक इनवेस्टमेंट फंड (पीआयएफ) जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीतून पीआयएफला जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 2.32 टक्के भागीदारी मिळेल. ही माहिती गुरुवारी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ने दिली.

11 गुंतवणुकीतून जिओला 1.15 लाख कोटी रुपये मिळाले

रिलायंसकडून जारी केलेल्या माहितीनुसार, पीआयएफने जिओ प्लॅटफॉर्म्सच्या 4.91 लाख कोटी रुपयांची इक्विटी व्हॅल्यूवर ही गुंतवणूक केली आहे. तर, एंटरप्राइजेज व्हॅल्यू 5.16 लाख कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. पीआईएफसह 10 कंपन्यांनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये आतापर्यंत 1,15,693.95 गुंतवणूक केली आहे. जिओने आतापर्यंत या गुंतवणुकीच्या बदल्यात 24.70 टक्के भागीदारी विकली आहे.

आतापर्यंत कोणत्या कंपनीने गुंतवणूक केली

आरआयएलने दिलेल्या माहितीनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये आतापर्यंत फेसबुक, सिल्वर लेक पार्टनर्स, विस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडला, आबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी, टीपीजी, एल केटरटन आणि पीआयएफने गुंवणूक केली आहे. यात फेसबूकची सर्वात जास्त 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. यासोबतच फेसबुकला जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9.99 टक्के भागीदारी मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...