आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमची विद्यमान आर्थिक स्थिती इतकी चांगली आहे का की तुम्ही सेवानिवृत्तीचा विचार करू शकता? या प्रश्नाचे महत्त्व एका वर्षापूर्वीपेक्षा आता वाढले आहे. विशेषत: जे रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहेत त्यांच्यासाठी. महागाई यामागील मोठे कारण असून ती तुमच्या बचतीचे मूल्य घटवत आहे. त्यामुळे तुम्हाला बचत वाढवण्याची गरज आहेच. परंतु महागाईमुळे ती शक्यताही कमी आहे. कारण खर्च वाढत आहेत.
जे लोक रिटायरमेंटच्या जवळ असतात त्यांना आपली जमापुंजी शेअर आणि त्याच्याशी संबंधित इन्स्ट्रूमेंट्स (जसे इक्विटी म्युच्युअल फंड) यातून काढून बाँड किंवा डेट फंडमध्ये शिफ्ट करण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला एका मर्यादेपर्यंत योग्य आहे. कारण सध्याची जागतिक परिस्थिती पाहता शेअर बाजारात जोखीम वाढली आहे. दुसरीकडे बाँड यील्ड ७.७ टक्क्यांवर गेल्याने डेट फंड्सचे रिटर्न बहुतांश बँक एफडीपेक्षा सुधारले आहेत.
रिटायरमेंटनंतर असा असावा पोर्टफोलियो
1. वय 60-69 वर्षे
शेअर 60%
बाँड 35%
कॅश 5%
2. वय 70-79 वर्षे
शेअर 40%
बाँड 50%
कॅश 10%
3. वय 80+ वर्षे
शेअर 20%
बाँड 50%
कॅश 30%
रिटायरमेंटसाठी कमी काळ, तर हे करा
1. शक्य तितकी मासिक गुंतवणूक वाढवा.
2. इक्विटीतील गुंतवणूक घटवा आणि डेटमध्ये वाढवा.
3. बँक फिक्स्ड डिपॉजिटमध्ये थोडे अधिक गुंतवा.
4. गोल्ड, सिल्व्हर ईटीएफ यातही थोडी गुंतवणूक करा.
गुंतवणुकीवर १०% रिटर्न, ५% महागाईनुसार स्थिती
तुमची बचत|समजा तुम्ही २०२३ मध्ये रिटायर होणार आहात. तुम्ही २९ वर्षांपूर्वीपासूनच यासाठी गुंतवणूक सुरू केली असेल. रिटायर होईपर्यंत तुम्ही दरमहा सरासरी १० हजार रुपये केले असतील. अशावेळी वर्षाला १०% सरासरी रिटर्न हिशेबाने रिटायर होईपर्यंत तुमची बचत २.२६ कोटींपेक्षा अधिक होईल.
महागाईचा परिणाम| समजा तुम्ही रिटायर झाल्यावर महागाई सरासरी ५% राहिली. अशावेळी ३० वर्षांनंतर तुमच्या बचतीचे मूल्य निम्मे म्हणजे १.१३ कोटी होईल. हे कधी होईल जेव्हा तुम्ही केवळ बचतीच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या रिटर्नवरच निर्वाह केला असेल तर. याची शक्यता कमीच. कारण रिटेल महागाईत मेडिकल, हाऊसिंग आणि कपड्यांची गणना होम नाही.
१० वर्षांचा सरासरी महागाई दर 6.04%
तथापि, नोव्हेंबरमध्ये रिटेल महागाई दर घटून ५.८८% झाला. पण बँक ऑफ बडोदाचा एक संशोधन अहवाल म्हणतोय की, डिसेंबरमध्ये तो पुन्हा६.५% वर पोहोचेल. तसेही २०१२ ते २०२२ दरम्यान देशात १० वर्षांचा सरासरी महागाई दर ६.०४% राहिला. जागतिक मंदीच्या शक्यतेने पुढील वर्षी महागाई थोडी कमी होऊ शकेल. परंतु ती ५% पेक्षा खाली येण्याची शक्यता कमीच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.