आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Savings Account I In This Bank Also Earns More Interest Than FD I Latest News And Update

आता आरबीएल बँकेच्या बचत खात्यावर 6.25% व्याज:वाचा- या बॅंकांच्या बचत खात्यावरही मिळते FD पेक्षा जास्त व्याज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बँकाकडून एफडी आणि बचत खात्यावर मिळणारे व्याज वाढविण्याचे काम केले जात आहे. खाजगी क्षेत्रातील RBL बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. व्याजदरात बदल केल्यानंतर आता या बँकेच्या खातेदारांना जास्तीत जास्त 6.25 टक्के दराने व्याज मिळणार आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगितले आहे की, हे नवीन दर 5 सप्टेंबर 2022 पासून म्हणजेच आजपासून लागू करण्यात आले आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय सध्या एफडीवर जास्तीत जास्त 5.50 % व्याज देत आहे. अशा परिस्थितीत RBL बँक बचत खात्यावर FD पेक्षा जास्त व्याज देत आहे.

बचत खात्यावर किती व्याज मिळेल
RBL बँकेच्या बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4.25% व्याज, 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 5.50% व्याज. 10 लाख ते 25 लाखांपर्यंतच्या ठेव रकमेवर 6% व्याज मिळेल आणि 25 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेव रकमेवर 6.25% व्याज मिळेल. कळवू की आधी हा दर 6% होता, पण रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर त्यात 25 आधार अंकांनी वाढ करण्यात आली आहे.

व्याज कधी जमा होईल
RBL बँकेच्या म्हणण्यानुसार, बँक खात्यातील दररोजच्या शिल्लक रकमेच्या आधारावर व्याज जोडेल आणि बचत खात्यातील व्याज तिमाही आधारावर खात्यात जमा केले जाईल. दरवर्षी व्याजाचे पैसे 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबर आणि 31 मार्च रोजी जमा केले जातील.

इतर बँकांमधील बचत खात्यावर किती व्याज आहे?

बॅंकेचे नावव्याज दर (%)
बंधन बॅंक3.00-6.25
इंडसइंड बॅंक3.50-5.50
यस बॅंक4.00-5.50
IDFC फर्स्ट बॅंक3.50-6.00
पोस्ट ऑफीस4.00
ICICI बॅंक3.00-3.50
HDFC बॅंक3.00-3.50
पंजाब नॅशनल बॅंक2.70-2.75
बॅंक ऑफ इंडिया2.90
एसबीआय2.70

बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावरही कर भरावा लागेल
आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत, बँक/सहकारी सोसायटी/पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याच्या बाबतीत व्याजातून वार्षिक 10,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्याजातून मुक्त आहे. त्याचा लाभ ६० वर्षांखालील व्यक्ती किंवा HUF (संयुक्त हिंदू कुटुंब) साठी उपलब्ध आहे. त्याचवेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, ही सूट 50 हजार रुपये आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास टीडीएस कापला जातो.

तुमचे एकूण उत्पन्न करपात्र नसेल तर काय करावे?
तुमच्या बचत खाते, FD किंवा RD मधून वार्षिक व्याज उत्पन्न 10 हजारांपेक्षा जास्त असेल, परंतु एकूण वार्षिक उत्पन्न (व्याज उत्पन्नासह) त्यावर कर आकारणीच्या मर्यादेपर्यंत नसेल. तर बँक TDS कापत नाही. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म 15H बँकेत आणि फॉर्म 15G इतरांना द्यावा लागेल. फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H हा स्व-घोषित फॉर्म आहे. यामध्ये तुम्ही तुमचे उत्पन्न कर मर्यादेच्या बाहेर असल्याचे नमूद करता. हा फॉर्म भरणाऱ्याला कराच्या जाळ्यातून बाहेर ठेवले जाते.

टीडीएस म्हणजे काय ?
जर कोणाचे काही उत्पन्न असेल तर त्या उत्पन्नातून कर वजा करून उर्वरित रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते. कर म्हणून कापलेल्या या रकमेला TDS म्हणतात. सरकार टीडीएसच्या माध्यमातून कर वसूल करते. पगार, व्याज किंवा कोणत्याही गुंतवणुकीवर मिळणारे कमिशन इत्यादी विविध प्रकारच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर ते वजा केले जाते. कोणतीही संस्था (जी टीडीएसच्या कक्षेत येते) जी कर भरत असते, ती ठराविक रक्कम टीडीएस म्हणून कापते.

बातम्या आणखी आहेत...