आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बूस्टर डोस:लॉकडाऊनमधील बचत आता बाजार फुलवणार, ऑटो क्षेत्राची घोडदौड, चांगल्या पावसामुळे ग्रामीण भागातही समाधान

मुंबई/ नवी दिल्ली / अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर रक्षाबंधनापासून सुरू होणाऱ्या सणांच्या हंगामासाठी बाजार तयार आहे. मार्च २०२० पासून सुरू लॉकडाऊनच्या सुमारे दीड वर्षाने पहिल्यांदाच बाजार पूर्णपणे सुरू झाला आहे. लसीकरण वाढणे व शाळा सुरू होण्यामुळे सकारात्मक भावना आहेत. अशात सामान्य ग्राहकांशी संबंधित रिअल इस्टेट, ऑटोमोबाइल, दागिने व रिटेल इंडस्ट्रीला रक्षाबंधन ते दिवाळीपर्यंत बंपर विक्रीची आशा आहे. उद्योगाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. नोकऱ्या व रोजगार वाढत आहे. मान्सून चांगला असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे संकेत आहेत. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा फर्म यूबीएसच्या नुसार, गेल्या वर्षी पर्यटन, मनोरंजन असे खर्च कमी झाल्याने भारतीयांनी सुमारे १५ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त बचत केली आहे. या वर्षीही बचत जवळपास अशीच राहील. यामुळे मागणी वाढेल. ऑटो इंडस्ट्रीचा अंदाज आहे की, विक्रीतील वाढ आतापर्यंतची सर्वाधिक होऊ शकते.

दागिने : सोन्याचा भाव 15% कमी, दुप्पट ग्राहकी शक्य
- दागदािगन्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट वाढ होण्याची आशा आहे.
- आशा का?: सोन्याचा भाव १५ टक्के उतरला आहे. अनलॉकनंतर आता विवाह समारंभ वाढतील.
- दागिन्यांच्या करनावळीत ५० टक्के सूट देण्याची सोने व्यापाऱ्यांची तयारी. फायनान्स सुविधांच्याही ऑफर्स
विविध राज्यांतील सराफा व्यापार संघटनांच्या अंदाजानुसार.

रिटेल: निर्बंध हटवल्यामुळे प्री-कोविडपेक्षाही जास्त आशा
- रिटेल विक्री प्री-कोविड पातळीच्या सुमारे ७८ टक्के आहे. आता विक्री प्री-कोविडच्या स्थितीची पातळी ओलांडेल.
- आशा का?: निर्बंध हटवल्यामुळे लोक बाजारात येत आहेत. खर्चही करत आहेत.
- मोठे रिटेलर्स सूटच्या ऑफर्स देतील. क्रेडिट व इतर कार्डवरही एजन्सी नव्या अॉफर्स देण्याची आशा.
कुमार राजगोपालन, अध्यक्ष, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया

रिअल इस्टेट : विक्री 30% वाढेल, 35% नवे प्रकल्प
- घरांची विक्री ३०% वाढेल, नवे प्रकल्प ३५% वाढतील.
- आशा का?: { अनेक राज्यांत स्टॅम्प ड्यूटीत सूट. घर खरेदी सणासुदीलाच होते. होम लोनचे व्याजदरही कमी आहेत.
- रजिस्ट्रीत, ईएमआयमध्ये सूट, सहज फायनान्स या ऑफर्स आहेत.
एक्स्पर्ट : जक्षय शहा, अध्यक्ष, क्रेडाई डॉ. निरंजन हिरानंदानी, अध्यक्ष नारेडको

बातम्या आणखी आहेत...