आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या सावित्री जिंदाल आशियातील सर्वात श्रीमंत महिला झाल्या आहेत. त्यांच्याकडे ८९.५ हजार कोटी रुपयांची(११.३ अब्ज डॉलर) मालमत्ता आहे. गेल्या ५ वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या यांग हुआयन देशातील मालमत्ता संकटामुळे संपत्ती गमावत तिसऱ्या स्थानावर घसरल्या आहेत. या वर्षी जानेवारीत यांग यांची संपत्ती २३.७ अब्ज डॉलर होती. ही या वर्षी निम्म्याहून जास्त घटून ११ अब्ज डॉलर राहिली. ब्लूमबर्ग इंडेक्समध्ये आशियातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला चीनच्याच फॅन होंगवेई आहेत. फॅन यांच्याकडे ११.३ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ब्लूमबर्गच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत सावित्री १६४ व्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत. कोविडकाळात सावित्री जिंदाल यांच्या नेटवर्थमध्ये चढ-उतार झाला. कोरोनाच्या सुरुवातीस त्यांची संपत्ती घटून ३.२ अब्ज डॉलर राहिली होती. मात्र, एप्रिल २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाई वाढल्याने त्यांची संपत्ती १५.६ अब्ज डॉलरजवळ पोहोचली होती. सावित्री जिंदाल, जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.