आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या सावित्री जिंदल आता आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सावित्री यांच्याकडे 89.49 हजार कोटी रुपयांची ($11.3 अब्ज डॉलर) संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनचा फॅन होंगवेई (Fan Hongwei)आहे. त्यांच्याकडे देखील 11.3 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे.
2021 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत महिला चीनची यांग हुआन होत्या, ज्या आता तिसऱ्या क्रमांकावर आल्या आहेत. त्यांची संपत्ती 87.11 हजार कोटी ($11 बिलियन) आहे.
सर्वात श्रीमंत लोकांमध्ये सावित्री 164 व्या क्रमांकावर आहेत
ब्लूमबर्गच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत सावित्री 164 व्या स्थानावर पोहोचल्या आहेत. गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे 9.35 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे.
सावित्री जिंदल या जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. ही कंपनी भारतातील स्टीलची तिसरी सर्वात मोठी उत्पादक असून सिमेंट, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत आहे.
कधी कॉलेजला गेल्या नाहीत
एका रिपोर्टनुसार, सावित्री जिंदल कधीही कॉलेजमध्ये गेल्या नाहीत. असे असतानाही पतीच्या आकस्मिक निधनानंतर त्यांनी संपूर्ण व्यवसायाची धुरा सांभाळली. त्या सांगतात की, जिंदल कुटुंबातील बहुतांश स्त्रिया घराची काळजी घेतात. तर पुरुष बाहेरचे काम पाहतात. त्यामुळे सावित्री यांना पतीचा व्यवसाय सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
आसाममध्ये झाला जन्म, हरियाणात झाले लग्न, जगभरात निर्माण केली ओळख
सावित्री देवी यांचा जन्म 1950 मध्ये आसाममधील तिनसुकिया येथे झाला. 1970 मध्ये, त्यांनी जिंदल ग्रुपचे संस्थापक हरियाणाच्या ओमप्रकाश जिंदल यांच्याशी लग्न केले. जिंदल ग्रुप स्टील आणि इतर अनेक क्षेत्रात सक्रिय आहे. ओपी जिंदल आणि सावित्री यांना नऊ अपत्य आहेत. त्यांना पृथ्वीराज जिंदल, सज्जन, रतन आणि नवीन अशी चार मुले आहेत.
मोठा मुलगा पृथ्वीराज हा जिंदल सॉ कंपनीचा अध्यक्ष आहे. दुसरा मुलगा सज्जन जिंदलने JWS कंपनीची कमान हाती घेतली आहे. तिसरा मुलगा रतन कंपनीत संचालक पदावर आहे. तर कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा नवीन जिंदल हे 'जिंदल स्टील'चे अध्यक्ष आहेत. यासोबतच ते खासदारही राहिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.