आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • SBI Bank Deposit Scheme; Investment Options To Earn Better Returns | Which Scheme Is Best For Deposit?

तुमच्या फायद्याची बातमी:SBI च्या दोन विशेष ठेव योजना या महिन्यात समाप्त होणार, सामान्य FD पेक्षा मिळत आहे जास्त व्याज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दोन्ही योजनांबद्दल जाणून घेऊयात...

भारतीय स्टेट बँक (SBI) च्या दोन विशेष ठेव योजना या महिन्यात समाप्त होत आहेत. SBI च्या प्लॅटिनम डिपॉझिट स्कीममध्ये 15 सप्टेंबरपर्यंत, तर वीकेअर स्कीममध्ये 30 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. या दोन्ही योजनांबद्दल जाणून घेऊयात.

प्लॅटिनम ठेव योजना
तुम्ही 15 सप्टेंबरपर्यंत 'एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट'चा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सामान्य ठेवींच्या तुलनेत 0.15% जास्त व्याज मिळेल. या योजनेचा लाभ 75 दिवस, 525 दिवस (75 आठवडे) आणि प्लॅटिनम 2250 दिवसांच्या (75 महिने) गुंतवणुकीवर उपलब्ध असेल. एसबीआय सध्या ठेवींवर (FD) जास्तीत जास्त 5.40% व्याज देत आहे.

या योजनेत किती व्याज मिळेल?

कालावधीसाधारणपणे व्याज दर (%)ऑफर अंतर्गत व्याज दर (%)
75 दिवस3.904.05
525 दिवस4.905.05
2250 दिवस5.405.55

SBI ची ज्येष्ठ नागरिकांसाठी 'वीकेअर' (We Care) ठेव योजना
एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी 'वीकेअर' ठेव योजना सुरू केली होती. 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये, ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त मुदत
ठेवींवर 0.80% अतिरिक्त व्याज दिले जात आहे.

एसबीआय मुदत ठेवींवर किती व्याज देत आहे?

कालावधीसाधारणपणे व्याज दर (%)ऑफर अंतर्गत व्याज दर (%)
7 ते 45 दिवस2.902.90
46 ते 179 दिवस3.903.90
180 ते 210 दिवस4.404.40
211 ते एक वर्ष4.404.40
एक वर्ष ते दोन वर्षे4.904.90
दोन वर्षे ते तीन वर्षे5.105.10
तीन वर्षे ते पाच वर्षे5.305.30
पाच वर्षांपेक्षा जास्त5.406.20

बातम्या आणखी आहेत...