आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • SBI Customers Can Stop Cheque Payment Sitting At Home, Know Its Online Process Here; News And Live Updates

कामाची गोष्ट:​​​​​​​एसबीआयच्या ग्राहकांना घर बसल्या थांबवता येणार चेक पेमेंट, येथे जाणून घ्या त्याची ऑनलाईन प्रक्रिया

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • इंटरनेट बँकिंगद्वारे थांबवले जाऊ शकते पैसे

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑनलाईन सुविधा प्रदान करत आहे. त्यापैकीच एक सुविधा म्हणजे चेक पेमेंट थांबवण्याची. तुम्ही जर एसबीआय ग्राहक असाल तर ही तुमच्या कामाची गोष्ट आहे. कारण आता सीबीआय आपल्या ग्राहकांना खूप साऱ्या सुविधा ऑनलाईन देत आहे. त्यामुळे तुम्हाला आता बँकेत जाण्याची गरज पडणार नाहीये.

तुम्हाला जर एखाद्या चेकचे पेमेंट थांबवायचे असेल तर ते घरबसल्या करता येणार आहे. त्यासाठी फक्त तुमचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्नित असावा. यासाठी तुम्ही SBI योनो किंवा SBI योनो लाइट ॲपचादेखील वापर करु शकता. चला तर जाणून घेऊया याची ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे.

इंटरनेट बँकिंगद्वारे थांबवले जाऊ शकते पैसे

 • चेक पेमेंट थांबवण्यासाठी तुम्हाला एसबीआयची अधिकृत वेबसाइट onlinesbi.com वर लॉग इन करावे लागेल.
 • आता 'ई-सर्व्हिसेस'मध्ये गेल्यावर 'स्टॉप चेक पेमेंट' या पर्यायावर क्लिक करा.
 • आता ज्या खात्यातून चेक जारी करण्यात आला ते खाते निवडा.
 • यानंतर पोर्टल तुम्हाला 'स्टार्ट चेक नंबर' आणि 'एंड चेक नंबर' विचारेल.
 • वापरकर्त्याने आता चेकचा प्रकार निवडावा.
 • ग्राहकाला येथे चेक थांबविण्याचे कारण द्यावे लागेल. यासाठी ग्राहक 'स्टॉप कॉज' पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतो.
 • एसबीआयच्या या सेवेसाठी फी स्क्रीनवर दिसून येईल. यानंतर आपल्या खात्यातून ती रक्कम स्वतंत्रपणे वजा केली जाईल.
 • शेवटी 'सबमिट करा' वर क्लिक करा आणि तुमच्या विनंतीचा तपशील पडताळण्यासाठी ओके वर क्लिक करा.
 • बँकेने विनंती स्वीकारल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर संदर्भ क्रमांक आणि इतर महत्त्वपूर्ण तपशीलांचा एक संदेश येईल. ज्यामध्ये हे यशस्वीरित्या सबमिट केली गेली असल्याचा मॅसेज येईल.

एसबीआय योनोमधून विनंती कशी पाठवावी?

 • ग्राहक हे एसबीआयच्या योनो अॅपवर लॉग इन करून चेक पेमेंटदेखील थांबवू शकतात.
 • त्यासाठी त्यांना 'विनंती' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर 'चेक बुक' व त्यानंतर 'स्टॉप चेक' यावर क्लिक करा. येथील ड्रॉपडाउन मेनूमध्ये खाते क्रमांक निवडा.
 • आता स्टार्ट चेक नंबर आणि एंड चेक नंबर भरा. येथे प्रारंभिक आणि शेवटचे अंक भरण्यास विसरू नका.
 • आता पेमेंट थांबविण्याचे कारण निवडा आण‍ि शेवटी 'सबमिट' वर क्लिक करा.
 • यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. ते भरा आणि सबमिट करा.
 • असे केल्यावर आपली विनंती बँकेत पोहोचेल आणि चेक पेमेंट थांबविले जाईल.

बँकेत जावून थांबवता येणार चेक पेमेंट
ग्राहकाला चेक थांबवण्याचा हा शेवटचा पर्याय आहे. बँकेत गेल्यावर तुम्हाला एक ॲप्लीकेशन द्यावे लागेल. यासाठी बँक तुमच्याजवळून काही रक्कम वसूल करेल. यावरील तीन मार्गाने आपल्याला चेक पेमेंट थांबवता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो सोपा पर्याय वाटेल तो निवडा.

बातम्या आणखी आहेत...