आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • SBI PNB Home Loan Processing Fees; Banks In India Offering Lowest Loan Interest Rates; News And Live Updates

तुमच्या फायद्याची गोष्ट:SBI आणि पंजाब नॅशनल बँकेने गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क केले माफ, अनेक संस्था यापेक्षा कमी व्याजाने देत आहेत गृह कर्ज

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहकर्ज घेताना या 4 गोष्टी लक्षात ठेवा

पंजाब नॅशनल बँक आणि एसबीआयने अलीकडे गुहकर्जावर एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, बँकांनी गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. एसबीआयने 31 ऑगस्टपर्यंत तर पंजाब नॅशनल बँक 30 सप्टेंबरपर्यंत शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशावेळी तुम्ही जर गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टीं आपण लक्षात ठेवले पाहिजे. जसे कोणती बँक किती व्याजदराने कर्ज देत आहे. किती प्रोसेसिंग फी आकारत आहे? चला तर जाणून घेऊया की, कर्ज देताना त्या बँकांची टर्म्स अँड कंडिशन्स आहे.

कोटक महिंद्रा बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज
आजघडीला मार्केटमध्ये कोटक महिंद्रा बँक सर्वात स्वस्त गृह कर्ज देत आहे. ही बँक इतर बँकांपेक्षा की दराने कर्ज देत आहे. या बँकेचा व्याज दर त्याचा 6.65% आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड देखील 6.66% गृहकर्ज देत आहे. यासोबतच अनेक बँका सध्या 7% पेक्षा कमी व्याज दराने गृहकर्ज देत आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणती बँकेंचे परवडणार त्यानुसार गृहकर्जाची निवड करावी.

बँकव्याज दर (%)प्रॉसेसिंग फी
कोटक महिंद्रा बँक6.65कमाल 10 हजार रुपये
LIC हाउसिंग फायनान्स लि.6.6610 ते 15 हजार रुपये
ICICI6.700.25% और कमाल 5 हजार पर्यंत
SBI6.7031 ऑगस्टपर्यंत माफ
पंजाब नॅशनल बँक6.8030 सप्टेंबरपर्यंत माफ

गृहकर्ज घेताना या 4 गोष्टी लक्षात ठेवा

कमी रकमेसाठी अर्ज करा
गृहकर्ज घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. कारण या गोष्टी आपण लक्षात न घेतल्यास आपले गृहकर्ज रिजेक्ट होऊ शकते. लो-टू-व्हॅल्यू (LTV) गुणोत्तरामुळे तुम्हाला कर्ज मिळणे सोपे होते. कमी एलटीव्ही निवडल्यामुळे मालमत्तेत खरेदीदाराचे योगदान वाढते आणि बँकेचा धोका कमी होतो. त्यामुळे बँका तुम्हाला लवकर गृहकर्ज देऊ शकतात. कोणत्याही बँका मालमत्ता मूल्याच्या 75-90% पर्यंत कर्ज देते. कर्जदारांना हे कर्ज डाउन पेमेंट किंवा मार्जिन योगदान म्हणून भरावी लागते. याशिवाय तुम्हाला कर्ज मिळणार नाही.

फिक्स ऑब्लिगेशन टु इनकम गुणोत्तर लक्षा ठेवा
जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेत कर्ज घेण्यासाठी अर्ज करता. तेंव्हा प्रत्येका बँका तुमचे फिक्स ऑब्लिगेशन टु इनकम गुणोत्तर (FOIR) पाहते. यामुळे किती दरमहा किती रुपयांपर्यंत हप्ता भरू शकता हे कळते. यासोबतच FOIR च्या माध्यमातून तुमचे सध्याचे EMI, घरभाडे, विमा पॉलिसी आणि इतर पेमेंट्सची किती टक्केवारी हे तुमच्या सध्याच्या उत्पन्नाचे किती टक्के आहे हे समजते. जर कर्ज पुरवठादाराला हे वाटले की, हे तुमच्या उत्पन्नाचे 50 टक्के आहे तर तुमचे अर्ज नाकारु शकते. त्यामुळे कर्जाची रक्कम यापेक्षा जास्त नसावी हे लक्षात ठेवा.

प्री-पेमेंट पेनल्टीबद्दल जाणून घ्या
अनेक बँका वेळेपूर्वी कर्ज भरल्यास पेनल्टी आकारु शकते. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी कोणती बँक किती पेनल्टी आकारते हे जाणून घ्या आणि त्यानंतरच याची निवड करा. कारण कर्जाची वेळेपूर्वी परतफेड केल्यास बँकांना अपेक्षेपेक्षा कमी व्याज मिळते. त्यामुळे अशा परिस्थितीत अनेक बँका त्यांच्या वतीने काही अटी व शर्ती लादतात. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी याबद्दलची संपूर्ण माहिती मिळवा.

संबंधित बँकेकडून घ्या कर्ज
जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर त्याच बँकेतून घ्या जिथे तुमचे खाते आहे. जिथे तुम्ही मुदत ठेव किंवा क्रेडिट कार्डची सेवा घेत आहात. कारण अनेक बँका त्यांच्या नियमित ग्राहकांना सहज आणि वाजवी व्याज दरात कर्ज देतात.

बातम्या आणखी आहेत...