आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर देताना कर्जावरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, एसबीआयकडून कर्जावरील व्याजाचे दर 0.15 टक्क्यांनी कमी केले जाणार आहेत. आता एसबीआयचे व्याजदर 7.40 टक्क्यांवरून घसरून 7.25 टक्के झाले आहेत. यासोबतच, ग्राहकांच्या डिपॉझिटमध्ये मिळणाऱ्या व्याजाचे दर सुद्धा 0.20 टक्के कमी करण्यात आले आहेत. दरम्यान, कर्जावरील व्याजदर घटल्याने मासिक हप्त्यांमध्ये 255 रुपयांची बचत होऊ शकते.
आरबीआयने मार्चमध्येच घोषित केली होती कपात
कर्जावर नवीन व्याज दर 10 मे पासून आणि एफडींवरील नवीन दर 12 मे पासून लागू केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, आरबीआयने मार्च महिन्यातच रेपो रेट 0.75 टक्क्यांनी घटवला होता. आरबीआयने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला होता. बँकांकडून लावल्या जाणाऱ्या एमसीएलआरमध्ये सलग 12 व्या वेळी आणि आर्थिक वर्ष 2020-21 ची ही दुसरी कपात आहे. तर मार्चपूईवी अशा प्रकारे एफडीमध्ये तीनदा कपात करण्यात आली आहे. तत्पूर्वी एसबीआयने व्याज दरांमध्ये 0.35 टक्के कपात घोषित केली होती. या निर्णयामुळे लोकांचे कर्जावरील हप्ते काही प्रमाणात कमी होणार आहेत.
7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज
एसबीआयने ट्विट करून ही माहिती जारी केली आहे. यासोबतच, एफडीच्या व्याजदरांमध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे. नवीन दरानुसार, 3 वर्षांच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजात 0.20 टक्के कपात करण्यात आली. सध्या एसबीआय 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.5 फीसदी व्याज देत आहे. तर 46 दिवसांपासून 179 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 4.5 टक्के आणि 180 ते एका वर्षापर्यंतच्या व्याजावर 5 टक्के व्याज दिला जातो.
25 लाख रुपये आणि 30 वर्षांच्या कर्जावर होईल मासिक 255 रुपयांची बचत
व्याजदरांमध्ये कपात लागू झाल्यानंतर एमसीएलआर खात्यांशी संबंधित ग्राहकांना लाभ मिळेल. अर्थात एखाद्या व्यक्तीने 30 वर्षांसाठी 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर त्याच्या ईएमआयमध्ये 255 रुपयांची बचत होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयने नवीन डिपॉझिट स्कीम आणली आहे. याला 'एसबीआय व्ही केअर' असे नाव देण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, होम लोनमध्ये एसबीआयची 34 टक्के भागिदारी आहे. तर ऑटो लोनमध्ये ही भागिदारी 34.86 टक्के आहे. डिसेंबर 2019 पर्यंत बँकेकडे एकूण 31 लाख कोटी रुपयांचे डिपॉझिट होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.