आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI चे सर्व्हर डाऊन:ऑनलाइन व युपीआय सेवांवर परिणाम, ग्राहकांच्या ट्विटरवर तक्रारी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्टेट बँकेच्या अनेक ग्राहकांना नेट बँकिंग आणि युपीआय सेवांसाठी अडचणींचा सामना कारवा लागत आहे. अनेक एसबीआय युझर्सनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर बँक सर्व्हर स्लो असल्याने येत असलेल्या अडचणींविषयी सांगितले आहे. या ट्विटसमध्ये लोकांनी सर्व्हर डाऊन आणि नॉन-रिस्पॉन्सिव्ह असल्याबद्दल म्हटले आहे.

एसबीआयच्या ज्या सेवांवर परिणाम झाला आहे, त्यात युपीआय पेमेंट आणि अधिकृत योनो अॅपचा समावेश आहे. याआधी एक एप्रिललाही एसबीआयच्या ऑनलाइन सेवांवर परिणाम झाला होता.

एक एप्रिललाही ऑनलाइन सेवांत अडचणी

यापूर्वी 1 एप्रिल, 2023 रोजीही एसबीआयने सर्व्हरच्या देखभालीविषयी सूचना दिली होती. वर्षअखेरच्या कामांमुळे INB/YONO/UPI च्या सेवा उपलब्ध नसतील असे एसबीआयने कळवले होते. स्टेट बँकेने ट्विट करून याची माहिती दिली होती.

सोमवारी सकाळपासूनच एसबीआयचे ग्राहक त्रस्त

देशाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेट बँकिंगसह अनेक सेवा सोमवार सकाळपासूनच ठप्प आहेत. अनेक युझर्सनी फंड ट्रान्सफरमध्ये येणाऱ्या अडचणींची तक्रारही केली आहे. एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग सेवांशिवाय युपीआय आणि योनो अॅपशी संबंधित सेवाही काम करत नाही.

ग्राहकांची व्यवहारांतील अडचणींची तक्रार

एसबीआयचे सर्व्हर डाऊन असल्याने येत असलेल्या अडचणींविषयी अनेक ग्राहाकंनी तक्रार केली आहे. अनेक ग्राहकांनी सांगितले आहे की त्यांच्या क्रेडिट कार्डचे पेमेंटही होत नाहिये. बँकेच्या वेबसाइटवर 'something went wrong at the bank servers. Please Retry'असे मेजेस येत आहेत. जागतिक पातळीवर बँक सर्व्हरमध्ये येणाऱ्या अडचणी ट्रॅक करणारी वेबसाइट डाऊन डिटेक्टरनेही एसबीआयच्या सेवांमध्ये येत असलेल्या अडचणींविषयी ट्विट केले आहे.

32 तासांपासून युझर्सची तक्रार

स्टेट बँकेच्या एका युझरने ट्विट करून लिहिले आहे की एसबीआयचा संपूर्ण पेमेंट गेटवे गेल्या 32 तासांपासून काम करत नाहिये. यादरम्यान बँकेकडून म्हटले गेले आहे की, प्रिय ग्राहक असुविधेसाठी क्षमस्व. कृपया पुन्हा प्रयत्न करा आणि समस्या कायम राहिल्यास आम्हाला कळवा.