आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोसेसिंग चार्ज:एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे खरेदीवर आकारणार 99 रुपयांचे शुल्क

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ईएमआयवर खरेदी केल्यास त्यावर आता कंपनी ९९ रुपये प्रक्रिया शुल्क आकारणार आहे. या प्रक्रिया शुल्काशिवाय कर वेगळा द्यावा लागणार आहे. एक डिसेंबर २०२१ पासून हा प्रोसेसिंग चार्ज लागू होणार आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड कंपनीने ग्राहकांना ई-मेलद्वारे ही माहिती कळवली आहे.

एसबीआय क्रेडिट कार्डधारकाने कोणत्या मर्चंट आउटलेट, ई-कॉमर्स वेबसाइट तसेच अॅपद्वारे ईएमआयअंतर्गत खरेदी केल्यास कार्डधारकाकडून ९९ रुपये शुल्क व कर आकारले जातील. समजा एखाद्या एसबीआय क्रेडिट कार्डधारकाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ईएमआय योजनेचा लाभ घेत मोबाइल बुक केला तर त्या कार्डधारकाकडून ९९ रुपये प्रक्रिया शुल्क व कर आकारला जाईल. हे शुल्क त्या ग्राहकाच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये ईएमआयच्या रकमेसह दिसेल. कार्ड प्रोव्हायडर चार्जेस आणि ईएमआयवरील व्याजाच्या रकमेशिवाय ही प्रोसेसिंग फी राहील. शून्य टक्के व्याज आकारणीच्या झीरो कॉस्ट ईएमआय योजनेंतर्गतच्या या कार्डद्वारे केलेल्या खरेदीवरही हे प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार असल्याचे एसबीआय क्रेडिट कार्ड कंपनीने स्पष्ट केले आहे. एक डिसेंबर २०२१ पासून हे प्रक्रिया शुल्क लागू होणार आहे. या निर्णयामुळे बाय नाऊ-पे लॅटरसारख्या योजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...