आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • SBI's Internet Banking And Other Services Including UPI Will Be Closed On September 4 And 5, Get Your Important Work Done Quickly; News And Live Updates

महत्वाची बातमी:आज रात्रीपासून SBI ची इंटरनेट बँकिंग आणि UPI सह 'या' सेवा राहतील बंद; महत्वाचे काम असतील तर आजच करुन घ्या

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 सप्टेंबरपर्यंत भरावे लागणार नाही प्रक्रिया शुल्क

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार, 4 आणि 5 सप्टेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या काही सेवा प्रभावित होणार आहेत. यामध्ये SBI इंटरनेट बँकिंग, UPI, YONO, YONO Business, YONO Lite, IMPS सारख्या सेवांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एसबीआयने जारी केलेल्या वेळेपर्यंत या सेवा काम करणार नाहीयेत. एसबीआयने सोशल मीडिया हँडल ट्विटवरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर आजच आपले काम करुन घ्या, नाहीतर तुम्हाला या सेवा सुरु होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मेंटेनन्स अॅक्टिव्हिटीमुळे बंद राहतील सुविधा
एसबीआय बँकेने म्हटले आहे की, "4 सप्टेंबर रोजी रात्री 10.35 ते 5 सप्टेंबर रोजी रात्री 1.35 वाजेपर्यंत (3 तास) मेंटेनन्स अॅक्टिव्हिटीचे काम केले जाणार आहे. यामध्ये इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Business, YONO Lite, IMPS, UPI सेवा या कालावधीत बंद राहतील. एसबीआयने पुढे म्हटले की, आमच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमस्व तुम्ही आम्हाला सहकार्य कराल ही विनंती.

15 सप्टेंबरपर्यंत भरावे लागणार नाही प्रक्रिया शुल्क
एसबीआयने गृह, वैयक्तिक, कार आणि सुवर्ण कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला कर्ज घेण्यावरही विशेष सवलत दिली जाणार आहे. एसबीआयने गोल्ड लोनवर 0.50% आणि कार लोनवर 0.25% सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. कार लोनचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया योनो एसबीआयवरुन करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...