आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आता कारणे दाखवा नोटीस, समन्स आणि आपले अन्य आदेश इंस्टंट मॅसेजिंग प्लॅटफार्मच्या माध्यमातून पाठवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी सेबी आता व्हॉट्सअॅप, सिंग्नल आणि टेलिग्रॉम या अॅप्सची मदत घेणार आहे.
याद्वारे लवकर मिळेल नोटीस
सेबीने सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे समोरच्याला नोटीस, समन्स किंवा अन्य काही कागदपत्रे लवकर पाठवण्यास मदत होऊ शकेल. यासोबतच ईमेल, पोस्ट आणि कुरियरदेखील पाठवले जाणार आहे. सेबी काळानुसार नेहमी बदल करत असते. आता व्हॉट्सअॅप, सिंग्नल आणि टेलिग्रॉमचा वापर सेबीत केला जाणार आहे
11 जुलैला सुप्रीम कोर्टाने दिली होती मान्यता
11 जुलै 2020 रोजी सुप्रीम कोर्टाने सेबीला या अॅप्सचे वापर करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप, सिंग्नल आणि टेलिग्रॉमद्वारे सेबी आपले आदेश, नोटीस तसेच समन्स समोरच्या पाठवू शकणार आहे. चीफ जस्टिस एस. ए. बोबडे, जस्टिस आर.एस. बोपन्नाच्या समोर अटॉर्नी जनरल के.के. वेणूगोपाल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालायासमोर सोशल मीडियाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे.
फिजिकल डिलीव्हरी लॉकडाऊन असतानाही शक्य
तुषार मेहता आणि वेणूगोपाल यांनी सांगितले होते की, लॉकडाऊऩदरम्यान तात्काळ नोटीस पाठवण्यासाठी हा उपाय योग्य असल्याचे मेहता आणि वेणूगोपाल यांनी म्हटले होते. न्यायालयाने म्हटले आहे की, ही पद्धत केवळ दिल्ली उच्च न्यायालयानेच स्वीकारली नाही, तर जिल्हा न्यायालये आणि वित्तीय अधिकारीही ही प्रणाली स्वीकारत आहेत. अलीकडेच चंदीगडमधील आर्थिक प्राधिकरणाने नेपाळमधील एका व्यक्तीला व्हॉट्सअॅपद्वारे नोटीस पाठवली असल्याचे देखील न्यायालयाने यावेळी निदर्शनास आणून दिले आहे.
नोटीसला नाकारू शकत नाही समोरची व्यक्ती
सेबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नोटीस पाठवल्यानंतर समोरची व्यक्ती त्याला नाकारू शकत नाही. सेबीने यासबंधी एक शिफारस देखील वित्तमंत्रालयाला पाठवली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन काळात सेबी सोशल मीडियाद्वारे नोटीस पाठवणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.