आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँड सक्सेस स्टोरी:दर मिनिटाला 10 युनिट्सची विक्री, विअरेबल बनवणाऱ्या जगातील टॉप-5 कंपन्यांपैकी एक

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोट *ऑडिओ ब्रँड *स्थापना- २०१६ *अपेक्षित मूल्यांकन - १५ हजार कोटी रु.
*अमन गुप्ता, संस्थापक ४१ वर्षीय अमन कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी, विक्री तज्ज्ञ आहेत. देशातील सर्वात तरुण सीएंपैकी एक असलेल्या अमन यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले. पहिला व्यवसाय वडिलांसोबत केला. पहिल्या तीन व्यवसायांत अपयशी ठरले. जेबीएलसोबतही काम केले.

*समीर मेहता, सहसंस्थापक ४६ वर्षीय समीर अध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम. केल्यानंतर समीर यांनी रेडवुड इंटरॅक्टिव्ह नावाची कंपनी सुरू केली. यानंतर त्यांनी कोरेस इंडिया नावाच्या कंपनीत १६ वर्षे काम केले. बोट कंपनीत त्यांची ४०% भागीदारी आहे.

‘बेबी को बेस पसंद है...’ हे सुलतान चित्रपटातील गाणे आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये आला असेल, पण ‘बोट’च्या अमन व समीर यांना बासची ही आवड २०१४ मध्येच कळली होती. ढोल-तबल्याची थाप आपल्या संस्कृतीत असल्याचे अमन सांगतात. भारतीय बाजारात असलेल्या हिअरेबल्समध्ये बास नव्हता. हीच उणीव दूर करून बोटने आपले स्थान निर्माण केले. कंपनी स्थापनेपासून नफ्यात आहे. गेल्या आर्थिक वर्षात ४५०% च्या वाढीसह नफा वाढत आहे. बोटच्या १५ ते १६ हजार युनिटची दररोज विक्री होते. म्हणजेच दर मिनिटाला १० युनिट्स विकली जातात. हेडफोन्सपासून सुरू झालेली कंपनी आता ऑडिओ, विअरेबल, मोबाइल-गेमिंग अॅक्सेसरीज, पर्सनल केअर या व्यवसायातही आहे. यावर्षी ३५०० कोटी रु. उभारण्यासाठी आयपीओ आणण्याची त्यांची योजना आहे.

६ वर्षांत जगातील टॉप-५ विअरेबल कंपनी कशी बनली बोट.... २०१६ मध्ये कशी सुरू झाली कंपनी दिल्लीचे अमन, मुंबईचे समीर २०१४ मध्ये भेटले. दोन वर्षे ऑडिओ मार्केटवर संशोधन केले. २०१६ मध्ये कंपनी सुरू केली. ही बाजारपेठ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ‘हाऊस ऑफ मार्ले’ नावाच्या ऑडिओ-साउंड कंपनीच्या उत्पादनांचे भारतात वितरण केले. या कंपनीच्या मॅनेजरनेच अमन-समीर यांची भेट घडवली होती.

२०० ब्रँड्समध्ये कसे मिळवले मार्केट?
२०१६ मध्ये हेडफोन्ससारख्या हिअरेबल्सच्या व्यवसायात २०० हून अधिक ब्रँड होते, चिनी-जपानी ब्रँडचे वर्चस्व होते. अशा स्थितीत ‘बोट’ आपले स्थान कसे निर्माण करेल, हे लोकांनी सांगितले. जुन्या व्यावसायिक श्रेणीत आणि विशेष नावीन्याशिवाय बोटने बाजारात प्रवेश केला. अमन यांच्या मते, त्याच्या एक्झिक्युशनने बोट स्थान निर्माण केले.

भारतीय ग्राहकांचा ‘बेस’ समजून घेतला
मार्केट गॅप समजून घेतला. हेडफोन्सच्या तारा (केबल्स) एकमेकांत गुंतत असत. बोटने गुंतामुक्त केबल बनवली. फोन खिशात ठेवूनही बोलता यावे म्हणून केबल लांब केली. प्लास्टिकऐवजी मेटॅलिक इअरफोन बनवले. भारतीयांना बास (धमक) सह गाणी ऐकायला आवडतात, म्हणून बासने इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीतावर केंद्रित हेडफोनमध्ये बास दिला. सुरुवातीचे उत्पादन ‘बोट बास हेड्स २२५’ होते. ते आजही मोठ्या प्रमाणात विकले जाते.

तरुणांची भाषा बोलणारी कंपनी
बोटची पंचलाइन ‘यंग अँड वाइल्ड’ आहे. बोट ब्रँडिंगमध्ये टिकाऊ, परवडणारे, अल्ट्रा फॅशनेबल असे शब्द वापरते. १८ ते २४ वयोगटातील ग्राहकांना लक्ष्य केले. कंपनी सुरू झाली तेव्हा अमन ३५, तर समीर ४० वर्षांचे होते. ग्राहकांना समजून घेण्यासाठी तरुण इंटर्नची नियुक्ती केली. त्यांची भाषा-भावना समजून घेतली. बोटीच्या प्रवासात व्यक्ती बाहेरच्या जगापासून दूर जाते, तसेच हेडफोन्स वेगळ्या जगात नेतील, असा बोट (नाव) या नावामागील तर्क होता.

बातम्या आणखी आहेत...