आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बेट:मोठ्या कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला, भविष्यातील ताऱ्यांवर गुंतवणूक करताहेत आजचे कॉर्पोरेट दिग्गज

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टार्टअप्सचा रिटर्न इतरांच्या तुलनेत चांगला

गुंतवणूक प्रकरणात कंपन्यांतील बड्या अधिकाऱ्यांचे विचार अलीकडच्या वर्षांत बदलले आहेत. ते जम बसलेल्या कंपन्यांच्या इक्विटीपेक्षा जे स्टार्टअप भविष्यात यशाचा झेंडा फडकावतील अशा स्टार्टअपमध्ये पैसा गुंतवत आहेत. वित्तीय पाठबळ चांगल्या स्टार्टअपला यशस्वी कंपनी बनवू शकते आणि यामुळे त्यांनी बक्कळ कमाई होऊ शकेल असे त्यांना वाटते. हजारो सीईओ, सीएफओ आणि सीटीओसारख्या अधिकाऱ्यांनी (सीएक्सओ) एंजेल फंड्सद्वारे स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणे सुरू केले आहे. देशाचा सर्वात मोठा एंजेल प्लॅटफॉर्म इन्फ्लेक्शन पॉइंट व्हेंचर्सच्या (आयपीव्ही) आकडेवारीनुसार, सध्या सुमारे ३,५०० सीएक्सओनी ८० पेक्षा जास्त स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. या समृद्ध वर्गाने या वर्षी ६० आणि स्टार्टअपमध्ये १५५ कोटी रु. गुंतवण्याची योजना आखली आहे. स्टार्टअपमध्ये सीएक्सओच्या भागीदारीमुळे जिथे नवउद्योजकांना भांडवल आणि व्यावसायिकांचा अनुभव मिळत आहे तिथे सीएक्सओना गुंतवणुकीचा असा प्लॅटफॉर्म मिळाला आहे, जिथे ते मोठी कमाई करू शकतात. जे सीएक्सओ एंजेल गुंतवणूकदार म्हणून स्टार्टअपमध्ये पैसा गुंतवू इच्छितात, त्यांच्यासाठी किमान गुंतवणुकीची मर्यादा वार्षिक २.५ लाख रु. प्रति स्टार्टअपपर्यंत आहे. यामुळे कमी गुंतवणुकीतही एखाद्या स्टार्टअपमध्ये भागीदारी शक्य होत आहे. देशातील बहुतांश स्टार्टअपच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूकदार प्रथमच एंजेल इन्व्हेस्टरच्या भूमिकेत आहेत.

स्टार्टअप्सचा रिटर्न इतरांच्या तुलनेत चांगला
सीएक्सओ कम्युनिटी सर्वसाधारणपणे रिअल इस्टेट, शेअर बाजार आणि सोन्यात गुंतवणूक करतात. पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास त्यांच्या तुलनेत स्टार्टअपचा रिटर्न चांगला राहिला. यामुळे सीएक्सओ स्टार्टअपकडे नवा अॅसेट क्लास म्हणून पाहत आहेत.
-अंकुर मित्तल, सहसंस्थापक, इन्फ्लेक्शन पॉइंट व्हेंचर्स

नवा अॅसेट क्लास झाला

  • गुंतवणूकदारांसाठी स्टार्टअप असा नवा क्लास आहे, जिथे खूप वेगाने पैसा तयार केला जाऊ शकतो.
  • स्टार्टअपच्या संस्थापकांसाठी सीएक्सओकडून भांडवल मिळण्याचा अर्थ दीर्घावधीची फंडिंग आहे.
  • देशाला फायदाही होत आहे. उद्योजकतेला प्रोत्साहनही मिळत आहे आणि रोजगार निर्मितीही होत आहे.

चांगल्या रिटर्नमुळे वाढली स्टार्टअपमध्ये सीएक्सओची रुची
आयपीओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, स्टार्टअपमध्ये सीएक्सओची भागीदारीमुळे जिथे नव उद्याेजकांना भांडवल आणि व्यावसायिकांचा अनुभव मिळत आहे, तिथे सीएक्सओला गुंतवणुकीचा असा तगडा प्लॅटफॉर्म मिळत आहे, जेथून ते बक्कळ कमाई करू शकतात. आयपीव्हीच्या आकडेवारीनुसार, २० टक्क्यांपेक्षा जास्त सीएक्सओने गेल्या ३ वर्षांत ५ पेक्षा जास्त स्टार्टअपमध्ये वार्षिक १५ लाख रुपयांची सरासरी गुंतवणूक केली आहे.८८% गुंतवणूकदारांना वार्षिक ३० टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...