आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Sensex Closes Up 36 Points At 58,803 I Gold silver Shines I Rupee Weak Against Dollar

शेअर बाजार अपडेट्स:सेन्सेक्स 36 अंकांनी वधारून 58,803 वर बंद, सोने-चांदी चमकली; डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्याच्या पाचव्या म्हणजेच व्यवहाराच्या शेवटचा दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार सपाट बंद झाला. सेन्सेक्स 36 अंकांच्या वाढीसह 58,803 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 16 अंकांच्या घसरणीसह 17,526 स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 11 समभाग तेजीत होते. तर 19 समभागात घसरण झाली.

दुसरीकडे म्हणजे सोन्या-चांदीच्या किमंतीतही शुक्रवारी वाढ झाल्याचे दिसून आले. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. तर चांदीबद्दल बोलायचे झाले तर आज 52,250 रुपये प्रति किलोवर चांदीचा भाव पोहोचला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 26 पैशांनी कमजोर झालेला होता.

बातम्या आणखी आहेत...