आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय बाजारांतील बळकटीमुळे देशांतर्गत शेअर बाजाराची वाटचाल सलग सातव्या दिवशी तेजीकडे दिसून आली. सेन्सेक्सने ३११ अंकांनी वाढून ३३ दिवसांनंतर ६० हजारांचा पल्ला आेलांडला. ताे ६०,१५८ वर बंद झाला. याआधी ८ मार्च २०२३ राेजी ताे ६० हजार ३४८ अंकांवर बंद झाला हाेता. या तेजीच्या सप्ताहाने अनेक गुंतवणूकदार श्रीमंत झाले.
निफ्टीमध्ये ९८ अंकांची वाढ झाली. ताे १७,७२२ वर बंद झाला. बाजारातील तेजीत धातू, बँक, वित्तीय संस्था, आॅटाे शेअर्सच्या श्रेणीतील खरेदीचे प्रमुख याेगदान राहिले. टेक, आयटी, कन्झ्युमर ड्युरेबल्स शेअरमध्ये झालेल्या विक्रीने निर्देशांकातील वाढ मर्यादित राहिली. आशियाई बाजारांत दक्षिण काेरिया, जपान, हाँगकाँगचे बाजारही तेजीत बंद झाले. परंतु शांघायच्या बाजारात घसरण दिसून आली. युराेपीय बाजार वाढीसह सुरू झाले. बँक, आॅटाे शेअरमधील तेजी मजबूत तिमाही आकड्यांच्या अपेक्षेमुळे दिसून आल्याचे मार्केट तज्ज्ञांना वाटते. आता अमेरिकन महागाईचे आकडे आणि एफआेएमसी बैठकीत काय घडते, यावरच जगभरातील शेअर बाजारांची दिशा ठरेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.