आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या नरमाईचा परिणाम होऊन देशांतर्गत शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात घसरण झाली. सेन्सेक्स १,१५८ अंकांनी घसरून ५३ हजार अंकांच्या पातळीच्या खाली आला. दिवसअखेर ५२,९३०.३१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्येही ३५९.१० अंकांनी घसरण झाली. निफ्टी १६ हजार अंकांच्या पातळीच्या खाली जात १५,८०८ वर बंद झाला. या दोन्ही निर्देशांकांची नऊ महिन्यांतील १० दिवसांची नीचांकी पातळी आहे. यापूर्वी २ ऑगस्ट २०२१ रोजी सेन्सेक्स ५२,९५०.६३ वर आणि निफ्टी १५,८८५.१५ वर होता.
विश्लेषकांच्या मते, जागतिक बाजारातील घसरण अमेरिकेतील उच्च महागाई दरामुळे झाली. त्यामुळे व्याजदरात मोठी वाढ होण्याची चिंता वाढली आहे. यासोबतच गुरुवारी संध्याकाळी देशांतर्गत महागाईची आकडेवारीही जाहीर होणार होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही सावध भूमिका घेत मर्यादित व्यवहार केले.
अलीकडील घसरणीमध्ये, सेन्सेक्सने त्याच्या विक्रमी बंद पातळीपासून ८,८३५.२८ अंकांनी (१४.३०%) आणि निफ्टी त्याच्या विक्रमी पातळीपासून २,६६९.०५ अंकांनी (१४.४५%) घसरले आहेत. दोन्ही निर्देशांक गेल्या वर्षी १८ ऑक्टोबर रोजी ६१,७६५.५९ आणि १८,४७७.०५ या विक्रमी पातळीवर बंद झाले. या महिन्याच्या सुरुवातीला, ४ मे रोजी, रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.४० टक्क्यांनी वाढवून ४.४०% केला होता. यानंतर, सेन्सेक्स ४,०४५.६८ अंक (७.१०%) आणि निफ्टी १,२६१.१० अंकांनी (७.३९%)
फेडरल रिझर्व्हचा धक्का कडक भूमिका, तरलता मर्यादित करून फेडरल रिझर्व्हने बाजाराला धक्का दिला. महागाई व फेडरल रिझर्व्हचे धाेरण पाहून विदेशी गुंतवणुकदार संस्था विक्री कमी करतील व बाजारात स्थिरता येईल असे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
घसरला आहे. २ मे रोजी ते ५६,९७५.९९ आणि १७,०६९.१० अंकांच्या पातळीवर बंद झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.