आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:वरच्या पातळीवरुन 136.69 अंकांनी घसरला सेन्सेक्स, निकालानंतर एसबीआय शेअरमध्ये 4% घसरण

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळली. मुंबई शेअर बाजारातील (BSE) सेन्सेक्स दुपारी 12.30 च्या सुमारास 700 हून अधिक अंकांच्या वाढीसह 53,660 च्या जवळ व्यवहार करत होता, ज्यात शेवटच्या ट्रेडिंग तासांमध्ये -136.69 अंकांची म्हणजेच -0.26% घसरण झाली. सेन्सेक्स 52,793.62 पातळीवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) चा निफ्टी देखील सुमारे 240 अंकांनी वर गेला. यामध्ये 16,050 च्या जवळ व्यवहार होत होता. त्या नंतर यामध्ये घसरण नोंदवण्यात आली. दिवसभराच्या व्यवहाराच्या अखेरीस निफ्टी -25.85 अंक म्हणजेच (-0.16%) घसरणीसह 15,782.15 या पातळीवर बंद झाला. तिमाही निकालानंतर SBI चा शेअर 4% घसरला.

बातम्या आणखी आहेत...