आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:अमेरिकेत व्याजदर वाढण्याच्या शक्यतेने 168 अंक घसरला सेन्सेक्स

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. सेन्सेक्स १६८ अंक घसरून ५९,०२९ वर बंद झाला. निफ्टीदेखील ३१ अंक घसरून १७,६२४ वर बंद झाला. विश्लेषकांच्या मते, अमेरिकेत व्याज आणखी वाढण्याची शक्यता याचे मोठे कारण ठरले. जागतिक पातळीवर वाढते व्याजदर आणि कमकुवत ट्रेंडमध्ये मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. दुपारनंतर काही निवडक समभागांमध्ये खरेदी झाल्यामुळे घसरण थोडी कमी झाली.

जियोजित आर्थिक सेवेचे संशोधन प्रमुख, विनोद नायर यांच्या मते, अमेरिकेतील रोजगार आघाडीवर सकारात्मक आकडेवारी आल्यानंतर व्याजदरात आणखी वाढ होण्याची भीती बळावली आहे. ताज्या आर्थिक आकडेवारीवरून असे दिसून येते की, यूएस मध्यवर्ती बँक व्याजदरात वाढ करत राहतील. जागतिक शेअर बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत बाजाराने सकारात्मक कल कायम ठेवला. ही स्थिती यापुढेही कायम राहू शकते.

बातम्या आणखी आहेत...