आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी पडझड, 304 अंकांची झाली घसरण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशांतर्गत शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३०४ अंकांच्या तोट्यासह ६०,३५३ वर बंद झाले. निफ्टीत ५१ अंकाची घसरण राहिली. ते १८, हजाराच्या खाली येऊन १७,९९९वर बंद झाले. बँकिंग, वित्तीय सेवा आणि आयटी समभागांच्या विक्रीने बाजार खाली घसरला कारण परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढत आहेत.

एनएसडीएलच्या आकड्यानुसार, परकीय गुंतवणूकदारांनी २,९७० कोटी रुपये भारतीय बाजारातून काढले, तर बुधवारी त्यांनी १,१०३.०७ कोटी रुपये भारतीय बाजारातून काढले. तज्ञांच्या मते, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या मिनिटांनी महागाई नियंत्रित करण्यासाठी आक्रमक व्याजदर वाढीचे संकेत दिले. जगभरातील बाजारपेठांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. त्याच वेळी, तेल आणि वायू, एफएमसीजी, ऊर्जा, वाहन, धातू, भांडवली वस्तू आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...