आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:फेडच्या मिनिटाआधी 519 अंकांनी घसरला सेन्सेक्स

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजारात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण आली. सेन्सेक्स ५१९ अंक घसरून ६१,१४५ वर आणि निफ्टी १४८ अंकांच्या घसरणीसह १८,१६० वर बंद झाले. ही कमजोरी जगभरातील बाजारात दक्षतेमुळे आली. यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बुधवारी (२३ नोव्हेंबर) रोजी मागील बैठकीचे इतिवृत्त जारी करणार आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या आरोग्याची जाणीव होण्यासाठी फेड मिनिटांची प्रतीक्षा करत आहे. व्यापाऱ्यांनुसार, फेड डिसेंबरमध्ये पुढील आढावा बैठकीत आणखी ०.५०% व्याजदर वाढवू शकते. गोल्डमन साक्स ग्रुप इंकने पुढील वर्षासाठी भारताच्या वाढीचा अंदाज कमी केला. एन्ड्रयू टिल्टनच्या कामगिरीत गोल्डमन साक्सच्या अर्थतज्ज्ञांनी एका अहवालात सांगितले की, कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये भारताचा विकास दर ५.९% ची नोंद करू शकते.

यापूर्वी गोल्डमनने विकास दर ६.९%ची नोंदी होण्याचा अंदाज दर्शवला हाेता. या बातमीनेदेखील मार्केट प्रभावित झाले आणि गुंतवणूकदारांनी बाजारापासून लांब राहणे चंागले समजले. परिणामी सकाळी सेन्सेक्स २०७ अंकांच्या कमजोरीसह ६१,४५६ वर उघडला. दिवसभर घसरणीचा दबाव राहिला. दुपारी ६०४ अंकांच्या घसरणीसह ६१,०५९ या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

बातम्या आणखी आहेत...