आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात तीन दिवसांपासून सुरू असलेली वाढ गुरुवारी थांबली. सेन्सेक्स ५४२ अंकांच्या घसरणीसह ५९८०६ वर बंद झाला. निफ्टीत १६५ अंकांची घसरण झाली. तो १७५९० वर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये विक्रीच्या दबावामुळे निर्देशांकांत घसरण दिसली. व्यावसायिकांनुसार चीनच्या महागाईच्या आकडेवारीत अपेक्षेपेक्षा कमी घट झाल्याच्या चिंतेने जगातील बहुतांश बाजार दबावात राहिले. तसेच अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढीबाबत चिंता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीने प्रभावित झाला. तज्ज्ञांनुसार अमेरिकन सरकार शुक्रवारी हायरिंगवर मासिक अहवाल जाहीर करेल. यामुळे व्याजदरात वाढीची किती गरज आहे याचे संकेत मिळतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.