आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर मार्केट:सेन्सेक्समध्ये 600 अंकांची सुधारणा झाली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणीसह देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी विक्रीचा दबाव राहिला. तर इंडेक्स हॅवीवेट शेअर्सच्या खरेदीच्या उत्साहामुळे काही प्रमाणात रिकव्हरी झाली. सेन्सेक्स १०४ अंकाच्या घसरणीसह ६१,७०२ वर आणि निफ्टीमध्ये ३५ अंक घसरुन १८,३८५वर बंद झाले.

आशियाई बाजारात विक्रीच्या दबावाला पाहता सेन्सेक्स एकवेळ ७०४ अंक घसरुन ६१,१०३ वर आणि निफ्टी २१८ अंक कोसळुन १८,२०३ वर आले होते.मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएसच्या शेअर्सच्या आघाडीत खालच्या स्तरावर खरेदी करून ते सावरले. सेन्सेक्समध्ये ६०० अंक आणि निफ्टीत १८३ अंकांची वसुली झाली. पण ते घसरणीतून पूर्णपणे सावरू शकले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...