आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्सची 900 अंकांनी उसळी; अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये तेजी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक शेअर बाजारांमधील सकारात्मक कल आणि परकीय चलन खरेदीमुळे शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ८९९.६२ अंकांनी वधारत ५९,८०८ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी २७२ अंकांपेक्षा अधिक उसळीसह १७,५९४ वर बंद झाला. बाजारातील या तेजीदरम्यान शुक्रवारी लागोपाठ चौथ्या दिवशी अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर सर्वाधिक १६.६० टक्क्यांनी वधारला. तर अदानी पोर्ट‌्समध्ये ९.७६ टक्क्यांची तेजी दिसली. याशिवाय अदानी ट्रान्समिशन, विल्मर, पॉवर, टोटल गॅस, ग्रीन एनर्जी, अंबुजा सिमेंट, एसीसी व एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये प्रत्येकी ५% तेजी राहिली. दिवगी टॉर्क ट्रान्सफरचा आयपीओ ३८% सबस्क्राइब : वाहन पार्ट मेकर दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टमच्या आयपीओला गुरुवारी बोलीच्या दुसऱ्या दिवशी ३८% सबस्क्रिप्शन मिळाले. आयपीओअंतर्गत केलेल्या ३८,४१,८०० समभागांच्या ऑफरच्या तुलनेत १४,४९,००० समभागांसाठी बोली प्राप्त झाली.

बातम्या आणखी आहेत...