आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Sensex Jumps By Selling Points At Banks, Casual Care Shares; Investors' Wealth Increased By Rs 1.99 Lakh Crore

कोरोना इम्पॅक्ट:बँक, आराेग्य निगा शेअर्स खरेदीने सेन्सेक्स विक्रमी अंकांनी उसळला; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.९४ लाख काेटी रुपयांची झाली वाढ

मुंबई / नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अंकांमध्ये १ दिवसातील माेठी वाढ, टक्क्यांत १० वी माेठी वृद्धी

अांतरराष्ट्रीय बाजारांतील तेजीनंतर मंगळवारी तीन दिवसांनंतर सुरू झालेल्या देशातील शेअर बाजारांत तेजीचे वातावरण दिसले. सेन्सेक्स- निफ्टीचे अंक एका दिवसातील सर्वात माेठ्या तेजीसह बंद झाले. टक्क्यांमध्येही त्यांची १० वी सर्वांत माेठी वाढ राहिली. सेन्सेक्स २४७६.२६ अंका(८.९७%)च्या वाढीसह ३०,०६७.२१ वर बंद झाला. निफ्टीत ७०८.४० अंका(८.७६%)ची तेजी राहिली. हा ८,७९२.२० च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारच्या या वाढीत बँक, फार्मा, एफएमसीजी, टेलीकाॅम, अाॅटाे, टेक कंपन्यांच्या नेतृत्वाखाली शेअर्समधील खरेदीचा महत्त्वाचा भाग राहिला. सेन्सेक्स शुक्रवारच्या बंद पातळीच्या तुलनेत १,३०७ अंक बळकटीने खुला झाला अाणि खरेदीदारीचा जाेर वाढल्याने दिवसभर त्याची वाढ सुरूच राहिली. ही सेन्सेक्सची ११ वर्षांतील माेठी वाढ अाहे. १८ मे २००९ राेजी २११०.७९ अंकाच्या वाढीसह १४,२८४.२१ च्या पातळीवर बंद झाला.निफ्टी ६५१.५५ अंकाच्या वाढीसह ४३२३.१५ च्या पातळीवर बंद झाला . टक्क्यांच्या हिशेबाने सेन्सेक्स २५ मार्च १९८६ राेजी ५७२.९७ वर बंद झाला हाेता. 

  • सेन्सेक्स शुक्रवारच्या तुलनेत १,३०७ अंकांनी उघडला, तेजी राहिली

इंडसइंड बँकेचे शेअर्स २२.६०% उसळले

बीएसई सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांच्या समभागांत वाढ दिसली. १४ कंपन्यांच्या समभाागांत १०% पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली. इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक २२.६०% वाढीसह ३८४.०५वर बंद झाले. अॅक्सिस बँक(१९.४१%), महिंद्रा अँड महिंद्रा(१४.४४%), अायसीअायसीअाय बँक(१३.८२%), एचयूएल(१३.५१%), मारुती(१३.४१%), हीराे माेटाेकाॅर्प(११.८३%)व  एचसीएल टेक(१३.५१%) यांचा क्रमांक लागताे.

अमेरिकी बाजारात ७% पर्यंत उसळी

अमेरिकी शेअर बाजारांत साेमवारी ७% पर्यंत उसळी नाेंदली. डाऊन जाेन्स इंडेक्स ७.७३% एसअँडपी ५०० निर्देशांक ७.०३%, नॅस्डॅक ७.३३%, एनवायएसई कम्पाेझिट ६.४२% वाढीसह बंद झाले. 

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ, देशात कोरोनाचा वेग मंदावणे व टाळेबंदी उघडण्याच्या अपेक्षेने वृद्धी

  • टाळेबंदी निघण्याची अाशा : सरकार देशव्यापी टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या तयारीत अाहे. या वृत्तानंतर व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले अाहे. यामुळे व्यावसायिक उत्पादन पुन्हा सुरू हाेण्याच्या अपेक्षेत चहुबाजूने खरेदीदारी झाली.
  • विदेशी गुंतवणूक येण्याची अपेक्षा : भारतीय बाजारातील लिस्टेड कंपन्यांमध्ये विदेशी पाेर्टफाेलिअाेची गुंतवणूक मर्यादा वाढवली अाहे. यामुळे ५३.२५० काेटी रुपयांची विदेशी गुंतवणूक येण्याची अपेक्षा अाहे. विदेशी गुंतवणूकदारांनी १ मार्चपासून १.३० लाख काेटी रुपये काढले आहेत.
  • अाैषध निर्यातीवरील निर्बंध हटवणे : अमेरिकेद्वारे पाऊल उचलण्याच्या शक्यतेमुळे २४ अाैषधांच्या निर्यातीवर निर्बंध लावला हाेता, ज्यांची देशातील एकूण अाैषधांच्या निर्यातीत १० टक्के भागीदारी अाहे.
  • अांतरराष्ट्रीय बाजारात तेजी : अमेरिकी शेअर बाजारानंतर अाशियाई बाजारांत वाढ हाेण्यासाेबत गुंतवणूकदारांचे मनाेबल बळकट झाले अाहे. दुपारी युराेपीय बाजारही बळकटीसह खुले झाले. लंडन शेअर बाजारात वाढ राहिली.

अाशियाई बाजार २% पर्यंत वाढले

अाशियाई बाजारांत मंगळवारी २% पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली. हाँगकाँग शेअर बाजारात हेंगसेंग इंडेक्समध्ये २.१२ टक्के वाढीसह बंद झाले. 


युराेपीय बाजारात ३-४%  व
ाढ

युराेपीय बाजारांत मंगळवारी ३-४% पर्यंत वाढ झाली. लंडनचा एफटीएसई ३.९१ जर्मनीचा डॅक्स ३.९१% अाणि फ्रान्सचा कॅक निर्देशांक ३.७१% वाढीसह व्यवसाय करत हाेते.

बातम्या आणखी आहेत...