आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजी आटली:सेन्सेक्सची 435 अंकांनी घसरगुंडी, दोन दिवसांच्या तेजीमध्ये गुंतवणूकदारांनी बँका आणि वित्तीय समभागांमध्ये नफारूपी कमाई केली

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांच्या तेजीमध्ये गुंतवणूकदारांनी बँका आणि वित्तीय समभागांमध्ये नफारूपी कमाई केली. दाेन्ही एचडीएफसीच्या विलीनीकरणाच्या घाेषणेमुळे मागच्या सत्रात हे दाेन्ही समभाग चमकले हाेते. परंतु मंगळवारी झालेल्या विक्रीच्या माऱ्यात या दाेन्ही समभागांची घसरण झाली.सेन्सेक्स ४३५.२७ अंकांनी घसरून ६०,१७६.५० अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टीचा निर्देशांक ९६ अंकांनी घसरून १७,९५७.४० अंकांच्या पातळीवर बंद झाला. गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युद्ध, वाढत्या तेलाच्या किमतीकडे लागले आहे. त्याचाही परिणाम बाजारावर झाला. जागतिक बाजारात नरमाईचे वातावरण असले तरी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक कल आहे.

“रशिया-युक्रेन युद्ध, दरातील वाढ आणि चलनवाढ यांचा बाजारावर परिणाम होत असल्याने अल्प ते मध्यम कालावधीत अस्थिरता राहू शकते,” असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...