आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स घसरला:फेडच्या व्याजदर वाढीच्या भीतीने सेन्सेक्सची घसरगुंडी

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात होत असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतलेल्यामुळे साैदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात समभागांवर दबाव आला. महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेतून बाजारात विक्रीचा मारा झाला आणि सेन्सेक्स घसरला.

कमकुवत रुपया आणि सतत बाजाराबाहेर जात असलेला परकीय निधीचा आेघ याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. तरीही माेठ्या प्रमाणावर झालेले जीएसटी संकलन आणि उत्पादन क्षेत्राची भरीव कामगिरी यामुळे घसरणीला काहीसा लगाम बसला.

दिवसभरात ६०० पेक्षा जास्त अंकांनी घसरल्यानंतर सेन्सक्स दिवसअखेर ८४.८८ अंकांनी घसरून ५६,९७५.९९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी ३३.४५ अंकांनी घसरून १७,०६९.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स यादीतील टायटन, विप्रो, टेक महिंद्र, इन्फाेसिस, एशियन पेंट, मारुती, स्टेट बँक,, कोटक बॅँक यांना विक्रीचा फटका बसला. परंतु इंडसइंड बॅक, एनटीपीसी, पाॅवरग्रीड, टाटा स्टील, एचडीएफसी, आयटीसी या समभागांची खरेदी झाली.

“फेडरल रिझर्व्हने नुकत्याच घेतलेल्या कडक धाेरणामुळे गुंतवणूकदारांनी फेडच्या आगामी फेड बैठकीपूर्वी सावध भूमिका घेतली. ज्यामुळे बाजारात उच्च अस्थिरता निर्माण झाली आहे. वाढता डॉलर निर्देशांक, परकीय गुंतवणूकदारांची विक्री वाढलेल्या वस्तूंच्या किमती यामुळे बाजारात जोखमीची भावना आणखी वाढली. “दुसरीकडे, जीएसटी संकलन, वाहन विक्री आणि एप्रिल महिन्यासाठी उत्पादन क्षेत्राच्या अाकडेवारीमुळे आर्थिक सुधारणांचे संकेत दिले असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...