आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्स 486 अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांना 3 लाख कोटी रुपयांचा फायदा, CMS च्या शेअरमध्ये 15 टक्क्यांनी वाढ

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजारात आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी मोठी तेजी पाहायला मिळत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 486 अंकांनी वाढून 58,280 वर व्यवहार करत आहे. टायटन आणि अल्ट्राटेकच्या शेअर्समध्ये 3-3% वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांना आज तीन लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

स्टॉक एक्स्चेंजवर सीएमएस इन्फोसिस्टमच्या शेअर्सच्या लिस्टिंगमधअये गुंतवणूकदारांची निराशा झाली. त्याचा शेअर 220 रुपयांवर लिस्ट झाला तर इश्यू किंमत 216 रुपये होती. त्यातून बाजारातून 1100 कोटी रुपये जमा झाले होते. तथापि, लिस्टिंग झाल्यानंतर, स्टॉक 15% वाढून 252 रुपयांवर पोहोचला. दुपारी त्याच पातळीवर व्यवहार होत होते.

55 अंकांनी वर उघडला होता सेन्सेक्स
कालच्या तुलनेत सेन्सेक्स आज 55 अंकांनी वाढून 57,849 वर उघडला. पहिल्याच मिनिटात 58 हजारांचा टप्पा पार केला. दिवसभरात, त्याने 58,304 ची वरची पातळी आणि 57,846 ची निम्न पातळी गाठली. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 7 शेअर्स घसरणीत तर 23 शेअर्स वधारत आहेत. टायटन, एअरटेल, अॅक्सिस बँक, कोटक बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह हे वाढणारे शेअर्स आहेत.

एशियन पेंट्स, मारुतीही तेजीत

याशिवाय एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, मारुती, रिलायन्स आणि एसबीआयचे शेअर्सही तेजीत आहेत. इन्फोसिस, इंडसइंड बँक, विप्रो, डॉ. रेड्डी आणि टेक महिंद्रा यांच्यासह एनटीपीसीचे शेअर्स कोसळले आहेत. सेन्सेक्समध्ये 373 अपर सर्किटमध्ये आणि 63 लोअर सर्किटमध्ये आहेत. सर्किट म्हणजे एका दिवसात स्टॉकमध्ये आणखी घसरण किंवा वाढ होऊ शकत नाही.

मार्केट कॅप 264 लाख कोटींच्या पुढे

लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 266.07 लाख कोटी रुपये आहे. काल ते 263.27 लाख कोटी रुपये होते. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 120 अंकांच्या वाढीसह 17,325 वर व्यवहार करत आहे. दिवसभरात त्याने 17,330 ची वरची आणि 17,238 ची निम्न पातळी केली.

निफ्टीचे 40 शेअर्स वधारले
50 निफ्टी स्टॉकमध्ये 40 वधारत आहेत आणि 10 घसरत आहेत. हिंदाल्को, टायटन, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स आणि कोटक बँक हे वाढणारे शेअर्स आहेत. एनटीपीसी, टेक महिंद्रा, इन्फोसिस, ओएनजीसी आणि विप्रो यांचे शेअर्स घसरणीत आहेत. त्याचे नेक्स्ट 50, मिड कॅप, बँक आणि वित्तीय निर्देशांक वधारत आहेत.

काल शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 12 अंकांनी घसरून 57,794 वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 9 अंकांनी घसरून 17,203 वर बंद झाला.

बातम्या आणखी आहेत...