आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Sensex Rises In Hopes Of Controlling Epidemic Wave; At This Time, Not At The National Level, But At The Local Level; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक धारणा:महामारीची लाट लवकर नियंत्रणात येण्याच्या आशेवर सेन्सेक्स वधारला; या वेळी राष्ट्रीय पातळीवर नव्हे, स्थानिक पातळीवर टाळेबंदी

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 508 अंक वधारला सेन्सेक्स; निफ्टी, मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक वाढीसह बंद

देशात कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेत रोज ३.५ लाखांहून अधिक रुग्णांचे निदान हाेणे आणि चाचणीत प्रत्येक चौथी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह निघाल्यानंतरही सोमवारी देशातील शेअर बाजार चांगल्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये ५०० अंकांहून जास्त उसळी आली. मध्यम-छोट्या कंपन्यांचे शेअर्सही वाढले. या वेळी राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर स्थानिक पातळीवर लॉकडाऊन केला जात आहे. बाजार-दुकाने बंद आहेत, मात्र कारखाने आणि कार्यालये सुरू आहेत. अशा स्थितीत गेल्या वर्षीसारख्या स्थितीची शक्यता कमी आहे.

आगामी काही दिवसांत महारोगराई नियंत्रणात येऊ शकते. सेन्सेक्स ५०८.०६ अंकांच्या(१.०६%) तेजीसह ४८,३८६.५१ पातळीवर बंद झाला आहे. निफ्टीही १४३.६५ अंकांच्या(१%) वाढीसह १४,४८५ च्या पातळीवर राहिला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या मिडकॅप निर्देशांकात ०.६०% व स्मॉलकॅप निर्देशांकात ०.८८% वाढ झाली. सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, एसबीआय, पॉवरग्रीड, बजाज ऑटो,रिलायन्स इंडस्ट्रीज जास्त वाढीत राहिले.

तेजीकडे कसे पाहतात बाजार विश्लेषक
तेजीस कारण नाही
ही केवळ आशेची झेप आहे. बाजारात तेजीचे कोणतेही ठोस कारण आहे, सध्या अनेक शहरांत निर्बंध आहेत, त्याचा परिणाम दिसेल. - अंबरीश बलिगा, स्वतंत्र बाजार विश्लेषक

लोक आशावादी
गेल्या लॉकडाऊननंतर शेअर बाजारात जोरदार तेजी दिसली हाेती. या वेळीही तसे होऊ शकते, असे लोकांना वाटते. जागतिक बाजाराची तेजीही आहे. - प्रकाश दिवाण, संचालक, अल्टामाउंट कॅपिटल

सुधारणेची शक्यता
महासाथ पीकवर असल्याचे बाजाराला वाटते. त्यात सुधारणा दिसते आहे.जाने-मार्च तिमाहीचे निकालही चांगले येत आहेत. - एस. रंगनाथन, रिसर्च हेड, एलकेपी सिक्युरिटीज

आव्हानात्मक वातावरणात तेजीची ४ कारणे
1. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना वाटते की, महारोगराईची दुसरी लाट पीकवर पोहोचत आहे. येत्या काही दिवसांत संसर्गाचा वेग घटू लागेल.
2. जाने-मार्च तिमाहीसाठी आलेले कंपन्यांचे निकाल चांगले राहिले. यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढेल, याचा परिणाम बाजारावर दिसेल.
3. एप्रिलमध्ये विदेशी गुंतवणूदारांकडून खरेदी नाही, तरी बाजार खाली आला नाही. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
4. देशातील फंडांनी आधीच नफा घेतला आहे. आता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कॅश जमा असून तो हळूहळू बाजारात येत आहे.

भारताची दोनअंकी वाढ संकटात
काही दिवसांआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा आर्थिक वृद्धी दर १२.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हा दोनआकडी वृद्धिदर संकटात आला आहे. देशाच्या उत्पादनात ६ टक्क्यांहून जास्त योगदान करणाऱ्या मुंबईसह देशातील बहुतांश भागांत आर्थिक हालचाली ठप्प आहेत. आरबीआयनेही वृद्धिदर दुरुस्त करून १०.५% केला आहे. किरकोळ हालचालींमध्येही घसरण आली आहे. यामुळे देशाच्या जीडीपीत ६० टक्क्यांचे योगदान देणाऱ्या खर्चावर परिणाम होऊ शकतो. आर्थिक विश्लेषकांनुसार, अशी स्थिती राहिल्यास आर्थिक वृद्धिदर दोन आकड्यांखाली येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...