आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामजबूत जागतिक संकेतादरम्यान आयटी आणि बँकेच्या समभागाच्या कामगिरीत खरेदी निघाल्याने देशांर्गत बाजारात दोन दिवसापासून सुरू असलेली घसरण थांबली. सोमवारी सेन्सेक्स ३२० अंक वाढून ६०,९४२ वर बंद झाले. निफ्टीही ९१ अंकांच्या वाढीसह १८,११९ च्या पातळीवर राहिला. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स ४९१ अंकांनी ६१,११३ वर गेला आणि निफ्टी १३५ अंकांनी वाढून १८,१६३ वर पोहोचला.
तज्ञांच्या मते, कंपन्यांच्या मजबूत परिणांमुळे बँक आणि आर्थिक सेवेला शेअर्सचा आधारा मिळाला. आक्रमक व्याजदर वाढीचा वेग कमी होण्याच्या आशेने आशिया आणि युरोपमधील बाजार तेजीत होते. याआधी शुक्रवारी अमेरिकेचे बाजारही कडावर बंद झाले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बीएसईच्या १९ पैकी १२ क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. आयटी निर्देशांक १.६५% वर वाढला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.